sponsers

Monday, March 1, 2010

[GarjaMaharashtraMaza] संधी पोलिस दलात भरती होण्याची...

 


संधी पोलिस दलात भरती होण्याची...

प्रा. सुभाष शहाणे

http://epaper.esakal.com/esakal/20100215/images/5691357285193752088/5174274992826141785_Org.jpgमहाराष्ट्रात एकाच दिवशी सर्वत्र भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे एका शहरातील उमेदवार दुसऱ्या शहरात प्रयत्न करू शकणार नाहीत. या भरती प्रक्रियेत मुंबई व गडचिरोलीमध्ये सर्वांत जास्त पोलिस शिपाई भरती होत असून, पुणे शहर पोलिस दलात 540 शिपायांची तर पुणे ग्रामीण पोलिस दलात 140 शिपायांची भरती होत आहे. या भरतीची इत्यंभूत माहिती देणारा हा लेख.

नेहमीप्रमाणे या वर्षीही पोलिस शिपाई भरती प्रक्रिया पुन्हा एकदा उशिरा का होईना सुरू झाली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या निवृत्या व वाढती गुन्हेगारी; तसेच नवनवीन पोलिस स्थानकांची निर्मिती या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर पोलिस भरती होत आहे. या भरती प्रक्रियेत मुंबई व गडचिरोलीमध्ये सर्वांत जास्त पोलिस शिपाई भरती होत असून, पुणे शहर पोलिस दलात 540 पोलिस शिपायांची भरती होणार आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलिस दलात 140 पोलिस शिपायांची भरती होत आहे. महाराष्ट्र राज्यात नियमाप्रमाणेच एकाच दिवशी सर्वत्र भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे एका शहरातील उमेदवार दुसऱ्या शहरात प्रयत्न करू शकणार नाहीत. इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणारा व विशिष्ट शारीरिक मोजमापे व क्षमता असणारा निरोगी व सुदृढ उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे.
या भरती प्रक्रियेची थोडक्‍यात माहिती पुढीलप्रमाणे आहे :

1) भरतीचे नाव : पोलिस आयुक्त, पुणे शहर पोलिस भरती - 2009.
2) जाहिरात क्र. : आस्था-3/1/पोभ-2009/2010.
3) प्रवेश अर्ज : उमेदवारास प्रवेश अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी रुपये 50/- ची इंडियन पोस्टल ऑर्डर किंवा "पोलिस आयुक्त, पुणे शहर' या नावाने काढलेला व पुणे येथे देय असलेला (Payable at Pune) राष्ट्रीयीकृत बॅंकेचा डिमांड ड्राफ्ट जमा करावा.
4) आवेदन अर्ज मिळण्याचे ठिकाण : डीडी/पोस्टल ऑर्डर देऊन अर्ज पुढील ठिकाणी ता. 8-2-2010 ते 5-3-2010 या दरम्यान सकाळी दहा ते पाच या वेळेत मिळतील.
अ) आर. एस. पी. शेड, पोलिस हेडक्वार्टर, शिवाजीनगर पुणे (फक्त महिला उमेदवारांसाठी).
ब) पुढील पोलिस स्टेशन कार्यालयात फक्त पुरुष उमेदवारांसाठी अर्ज मिळतील. उदा.- पोलिस स्टेशन, स्वारगेट, येरवडा, निगडी, पिंपरी, हडपसर, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे येथे अर्ज मिळतील.
5) पूर्णतः भरलेला अर्ज सादर करण्याचे स्थळ : उमेदवारांनी आपला पूर्णतः भरलेला अर्ज आवश्‍यक त्या कागदपत्रांसह ता. 8-3-2010 रोजी सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत पुढील ठिकाणी (अर्ज क्रमांकानुसार) सादर करावा. उदा.- आवेदन अर्ज क्रमांक 1 ते 2000, 14001 ते 15000, 24001 ते 26000 पर्यंत शिवाजीनगर मुख्यालय, पुणे येथे अर्ज सादर करावेत. याप्रमाणे एस. पी. कॉलेज ग्राउंड, जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, अण्णासाहेब मगर स्टेडियम, एसएसपीएमएस ग्राउंड, मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी, सातव मैदान, अरण्येश्‍वर इ. मैदाने.
(उमेदवारांनी जाहिरातीमधील आवेदन अर्ज क्रमांक व मैदान काळजीपूर्वक तपासून पाहावे.)
6) पोलिस शिपाई : सामाजिक आरक्षण : एकूण 540 पदसंख्येत पुढीलप्रमाणे पदांचे आरक्षण आहे. : खुला वर्ग (General) - 241, ओबीसी-91, एसी-87, एसटी-40, बिजाअ-17, भजब-16, भजक-27, भजड-11 व बिमाप्र-10 इ.
7) शैक्षणिक पात्रता - उच्च माध्यमिक बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावा.
8) वयोमर्यादा - ता. 28-2-2010 रोजी वय 18 वर्षे ते 25 वर्षांपेक्षा अधिक नसावे. (मागासवर्गीयांना उच्चतम वयोमर्यादा पाच वर्षे शिथिलक्षम राहील.)
9) शारीरिक पात्रता - महिला - किमान उंची 155 सेंटिमीटर पुरुष - 1) किमान उंची 165 सेंटिमीटर, 2) छाती - न फुगवता - 79 सेंटिमीटर (विस्तार 5 सेंटिमीटर.)
10) चाचणी परीक्षा -
अ) शारीरिक चाचणी परीक्षा - 100 गुण.
ब) लेखी परीक्षा - 75 गुण.
क) मुलाखत चाचणी परीक्षा - 25 गुण.
अ) शारीरिक चाचणी परीक्षेत पुरुषांसाठी - 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 10 पूल अप्स काढणे, लांब उडी व गोळाफेक इत्यादी आहे.
महिलांसाठी - 200 मीटर्स धावणे, 3 किलोमीटर चालणे, लांब उडी, गोळाफेक (4 कि.ग्रॅ.)
ब) लेखी परीक्षेसाठी अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे -
1) अंकगणित, 2) सामान्यज्ञान व चालू घडामोडी, 3) मराठी भाषेत निबंधलेखन.
11) अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
1) शाळा सोडल्याचा दाखला, 2) गुणपत्रक, प्रमाणपत्र इ., 3) जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र, 4) जेमासाईल प्रमाणपत्र, 5) खेळाडू व एनसीसी प्रमाणपत्र, 6) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
12) पोलिसांची बेवसाईट -
www.punepolice.com आणि www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर पोलिस भरतीची माहिती मिळेल; तसेच पोलिस हेडक्वार्टर, शिवाजीनगर, पुणे येथील नोटीस बोर्डावर माहिती मिळेल. याप्रमाणेच भरतीची प्रक्रिया, लेखी परीक्षा व मुलाखत यांसंबंधी मार्गदर्शनासाठी मोबाईल नं. 9561345129 यावर संपर्क साधावा.
13) पुणे शहर पोलिस भरतीचे संपर्क अधिकारी - अनंतराव रोकडे, उपायुक्त, मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे हे आहेत.
14) पुणे ग्रामीण पोलिस दलात 140 पोलिस शिपाई भरती होणार आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, या नावाने रु. 50/- चा डीडी काढावा लागेल. या भरतीचे संपर्क पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण आहेत. त्यांचे कार्यालय, पुणे ग्रामीण पोलिस कार्यालय, पाषाण रोड, चव्हाणनगर, पुणे येथे आहे. यांच्या अंतर्गत हवेली, लोणावळा, भोर, खेड, जुन्नर, बारामती, दौंड ग्रामीण पोलिसचा समावेश होतो.
या भरतीसाठी वरील सर्व पात्रता निकष समान आहेत.
याप्रमाणेच दौंड व वानवडी येथेही एसआरपी पोलिस (सशस्त्र दल) भरती होत आहे.
15) मार्गदर्शक पुस्तके -
या परीक्षेसाठी पुढील पुस्तके उपलब्ध आहेत. जिगर पोलिस भरती मार्गदर्शक (प्रगती प्रकाशन, पुणे), विद्याभारती, के. सागर, प्रगती प्रकाशन, चालू घडामोडी पुस्तक, नवनीत निबंध, दांडेकर गणित.
16) लेखी परीक्षेचे वर्ग - पुणे शहर पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचे व मुलाखत चाचणीचे मार्गदर्शन पुढील ठिकाणी मिळेल - स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, द्वारा - प्रदीप क्‍लासेस, 408, सोमवार पेठ, शाहू उद्यानामागे, संत गाडगे महाराज रस्ता, भाजी मंडईजवळ, पुणे 11. अधिक माहितीसाठी संपर्क -

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers