बदलत्या बॅंकिंगमधील नावीन्यपूर्ण संधी
प्रा. क्षितिज पाटुकले
http://epaper.
बॅंकेतील नोकरी म्हणजे आर्थिक स्थैर्य, असे समीकरण सर्वत्र रूढ आहे. बॅंकिंग क्षेत्रातील व्यवसायाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आज बॅंक ठेव स्वीकारणारी आणि कर्ज देणारी संस्था असे बॅंकेचे पारंपरिक रूप बदलून ती आता सर्व प्रकारच्या आर्थिक सुविधा देणारी अर्थकल्पतरू झाली आहे. बॅंकिंगबरोबरच गुंतवणूक, विमा, परकीय चलनाचे व्यवहार, ऑनलाइन आर्थिक व्यवहार, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ट्रस्टी, म्युच्युअल फंड, शेअर्स, कमोडिटी सेवा पुरवणारी संस्था म्हणून ती सशक्त होत आहे. आज ज्या व्यक्तींना बॅंकेत नोकरी पाहिजे आहे, त्यांच्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग अँड फायनान्स (आय.आय.बी.एफ.)चे विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील. पूर्वी बी.कॉम. झाल्याबरोबर बॅंकेत नोकऱ्या मिळत असत. त्यांना एम.बी.ए., बॅंकिंग, फायनान्स यांना संधी मिळत होत्या. मात्र, आता बदलत्या बॅंकिंगमध्ये बॅंकिंगबरोबरच इतर क्षेत्रांतील कौशल्यही गरजेचे आहे. त्यामुळे बॅंकिंगमध्ये करिअर करण्यास विविध क्षेत्रांतील कौशल्याची गरज निर्माण झाली आहे.
बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन "आयआयबीएफ'ने विविध डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
1) डिप्लोमा इन बॅंकिंग अँड फायनान्स यात तीन विषयांचा अभ्यास असतो.
1. प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ बॅंकिंग.
2. अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर बॅंकर्स.
3. लीगल ऍण्ड रेग्युलेटरी ऍस्पस्ट ऑफ बॅंकिंग ऑपरेशन्स.
हा अभ्यासक्रम "जेएआयआयबी'ला समतुल्य मानला जातो. (जेएआयआयबी ही सीएआयआयबीच्या आधीची परीक्षा असते.) कोर्सची फी ही 3200 रुपये असून, त्यासाठी कोचिंग उपलब्ध आहे.
2) डिप्लोमा इन इंटरनॅशनल बॅंकिंग अँड फायनान्स यात तीन विषयांचा अभ्यास असतो.
1. इंटरनॅशनल बॅंकिंग ऑपरेशन्स.
2. इंटरनॅशनल बॅंकिंग, लीगल अँड रेग्युलेटरी ऍस्पेट्स.
3. इंटरनॅशनल कार्पोरेट फायनान्स.
ज्या व्यक्तींना या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी फार उपयुक्त अभ्यासक्रम आहे. त्याचे शुल्क पाच हजार रुपये आहे.
3) डिप्लोमा इन बॅंकिंग टेक्नॉलॉजी, यात तीन विषयांचा अभ्यास केला आहे.
1. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक बॅंकिंग.
2. डिझाईन डेव्हलपमेंट अँड इंप्लिमेंटेशन ऑफ इनफॉर्मेशन सिस्टिम.
3.सिक्युरिटी इन इलेक्ट्रॉनिक बॅंकिंग.
आय.टी.ची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये प्रगतीसाठी उपयुक्त आहे. त्याचेही शुल्क पाच हजार रुपये आहे.
4) डिप्लोमा इन ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट.
यात तीन विषयांचा समावेश होतो.
1. फायनान्शियल मार्केट अँड ओव्हर व्ह्यू.
2. ट्रेझरी मॅनेजमेंट.
3. रिस्क मॅनेजमेंट.
याचे शुल्क वीस हजार रुपये आहे.
5) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल ऍडव्हायझिंग- सर्व प्रकारचे आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीबद्दल माहिती देणाऱ्या या अभ्यासक्रमात विविध क्षेत्रांशी संबंधित सहा विषयांचा समावेश होतो. (12,500 रुपये शुल्क.)
6) ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स इन अर्बन को-ऑप बॅंकिंग- सहकार क्षेत्रातील व्यक्तींना करिअरमध्ये उपयुक्त असलेला अभ्यासक्रम. तीन विषय व शुल्क 6000 रुपये.
7) डिप्लोमा इन होम लोन ऍडव्हायझिंग- दोन विषयांच्या या अभ्यासक्रमाची शुल्क 6000 रुपये. गृहकर्ज क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम.
8) डिप्लोमा एक्झामिनेशन फॉर माइक्रो फायनान्स प्रोफेशनल- बचत गट व लघुउद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त. शुल्क 5000 रुपये.
9) डिप्लोमा इन कमॉडिटी डेरिव्हेटिव्हज - कमॉडिटी मार्केटमध्ये नोकरी करणाऱ्या किंवा करिअर करण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम. (शुल्क 6000 रुपये.)
वरील सर्व अभ्यासक्रमांना पात्रता कोणत्याही शाखेची पदवी ही आहे.
10) सर्टिफिकेट कोर्स फॉर बिझनेस कॉरस्पॉन्डन्स/फॅसिलिएटर दहावी पास युवकांना विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठीही कोर्स आहे. या कोर्सनंतर युवकांना ग्रामीण भागात बॅंकांसाठी बिझनेस फॅसिलिएटर म्हणजे ए.टी.एम.सारखे काम करण्याची संधी मिळेल. (शुल्क 4000 रुपये.)
या सर्व अभ्यासक्रमाची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन असते. या शुल्कात "कोर्स मटेरिअल' समाविष्ट असते. अधिक माहितीसाठी www.iibf.org.
सर्व बॅंका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे "आयआयबीएफ'चे मेंबर आहेत व अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीची माहिती "आयआयबीएफ'तर्फे या संस्थांना दिली जाते. विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी मदत मिळते. अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळालेल्या उमेदवारांची यादीसुद्धा वेबसाइटवर उपलब्ध आहे.
खरे तर बॅंकिंगच्या विस्ताराला प्रचंड वाव आहे. सध्या देशात बॅंकांच्या 76000 शाखा आहेत. तरीही एकूण लोकसंख्येच्या फक्त 12 टक्के लोकांना बॅंकिंग सेवांचा लाभ घेता येणे शक्य आहे. लाख लोकसंख्येमागे फक्त 9 शाखा आहेत. त्यामुळे सर्व पदवीधारकांना बॅंकिंगमध्ये चांगले करिअर करता येईल. 2009 मध्ये स्टेट बॅंक, युनियन बॅंक आदी बॅंकांनी पंचवीस हजारांहून अधिक लोकांची भरती केली आहे. पुढील 10 वर्षे बॅंकिंगमध्ये जोरदार भरती अपेक्षित आहे.
"आयआयबीएफ'च्या अभ्यासक्रमांची वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व कोर्स कमी शुल्कात उपलब्ध आहेत. युवकांनी बॅंकिंगमध्ये करिअर करण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे.
0 comments:
Post a Comment