Subject: Khant.....
खंत.....
By उदय सप्रे
Created 1 डिसें 2009
२६-११-२००८ नंतर त्यावेळचे गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला , आणि आज १ वर्षानी परत तेच गृहमंत्री आहेत !
निर्लज्जपणाचा यापेक्षा दुसरा दाखला कुठे असेल?
आणि हेच दिलासा देणार की अशोक कामते यांच्या बाबत चौकशी केली जाईल.....
या परिस्थितीचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.....
खंत.....
आसवांचे केव्हढे उपकार झाले ,
मारेकरी कणवेस साक्षीदार झाले !
( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र कणवेस पात्र ठरला !)
जाधवांचे दु:ख जाणावे कसे?
साथ ते सोडून .....दावेदार झाले !
( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले , आणि हात जायबंदी असल्याने समोर बंदूक असूनही आपण त्यांना वाचवू शकलो नाही हा आपल्याच त्या साथीदारांचा दावा असल्याची खंत आजही जाधवांच्या डोळ्यात जाणवते !)
बघ पुन्हा झाले निखारे शांत आता ,
कालचे ते शेंबडे....."सरदार" झाले !
( ज्या कारणासाठी असमर्थपणे राजीनामा द्यावा लागला , तेच आज परत त्याच पदावर आले ! लोक पण हे सारे विसरले , एकदा "शहीद" अशी पदवी दिली आणि हारतुरे घातले की आपले - माझे-तुमचे सार्यांचेच कर्तव्य संपले , इतकीच आमच्या निखार्यांची धग असावी ना?)
चिलखते चोरीस केंव्हाचीच गेली ,
बार म्हणुनी फुसकेसुद्धा.....दमदार झाले !
(काही स्पष्टीकरण आवश्यक आहे का यावर?)
अफझल्या बघ आपल्या गुर्मीत आहे
रुतंबरा सारखे ...."गद्दार" झाले !
( आमची माणसे मारून अफझल अजून जीवंत आहे आणि चिथावण्या दिल्या वगैरे आरोप ठेवून आमचीच माणसे साध्वी रुतंबरा सारख्या लोकांना जातीवादी आणि गद्दार ठरवले जाते आहे !)
हाय ! झाकोळून गेले तेज अन.....
चेहेरे पुन्हा, अळणी , कसे ?.....चवदार झाले !
( जे शहीद झाले त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी काय गमावले ? चार पैसे फेकून सगळीकडे या मागे राहिलेल्या माणसांची जाहिरात करून आपलीच पाठ थोपटत सारे वर्तमान्पत्र वगैरे तथाकथित "मीडिया"वाले मात्र "थंडा"वले ! )
दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
....स्मारकांचे बस् इथे हक्क्दार झाले !
(छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम रयतेसाठी , एका दीन माणसासाठी कधीही "राजा" असून ऐश्वर्याचा उपभोग घेतला नाही ! अश्या या "श्रीमंत योगी" महाराजांचे "स्मारक" बनवण्यासाठी कोट्यानोकोटी रुपये खर्च करणे ....हा एव्हढाच हक्क आता छत्रपतींचा एका साध्या रहाणीच्या भारतीय माणसावर राहिला हा केव्हढा दैवदुर्विलास !)
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
0 comments:
Post a Comment