sponsers

Wednesday, December 9, 2009

[maiboli] मराठी कसे टंकावे

 

दोन प्रकारे मराठी टंकता येते-

१. मराठी IME वापरुन- पुर्वी जसे टाईपराटरवर लिहिले जायचे त्याचे हे मराठी रुप. कळा स्वर व व्यंजने ह्यांचा मिलाफ घालून तयार केला आहे. 

लिला मेहेंदळे ह्यांनी IME वापरुन कसे मराठी लिहायचे ते एका चित्रफितीत दाखवले आहे- हा दुवा पहावा-

इनस्क्रिप्ट मराठी धपाधप लेखन हेतू: http://leenamehendale.blogspot.com/2008/05/blog-post.html

२. मराठी ट्रान्सलिटरेशन

आहे त्या ईग्रजी क्वर्टी कळपटाचा उपयोग करुन मराठी हा शब्द लिहायचा असेल तर "maraaThi" असा टंकला की, तो देवनागरी लिपीत "मराठी" उमटतो. ह्यासाठी तुम्हाला मराठी मुळाक्षरे कोणत्या कळजोडीने (की-कॉम्बिनेशनने) उमटेल ते माहिती असणे आवश्यक आहे. 


आता वरील दोन्ही प्रकारात टंकण्यासाठी कोणत्या मुक्त प्रणाल्या उपलब्ध आहेत ते पाहू. 


१. मराठी IME तुम्हाला तुमच्या विंडोज XP, Vista, 7 किंवा लायनक्स मधे "लॅन्गवेजेस ऍन्ड सेटींग्ज" मधे जाऊन मराठी लिपीचा व कळपटाचा अंतर्भाव तुमच्या प्रणालीमधे करावा लागतो. त्यानंतर तुमच्या सिस-ट्रे मधे कळपटाचा आयकन दिसतो. त्या आयकन वर माऊस नेल्यास तुम्हाला EN आणि MR अशी निवड करण्याची पध्दत दिसेल. 

IME शिकण्यासाठी वर दिलेली चित्रफित पाहिली तर खूप लवकर टंकता येईल. अथवा खालील दुव्यावर जाऊन आणखी माहिती मिळवता येईल- 

http://www.cdac.in/html/gist/down/key.asp INSCRIPT KEYBOARD TUTOR DOWNLOAD


२. ट्रान्सलिटरेशन वापरुन अनेक आयुध तुम्हाला मुक्तपणे उतरवून घेता येतील व ३० मिनिटात मराठी टंकता येईल. मला आवडणारी मुक्त आयुधं- 

  • गमभन: http://www.gamabhana.com. येथे जाऊन "लाईट" किंवा "प्रो" अशा दोन पैकी कोणतीही प्रणाली उतरवून घ्यावी. ही प्रणाली "इन्स्टाल" करायची गरज नसते. तुम्ही ते पॅकेज अनझिप केले की, त्यात तुम्हाला "index.html" दिसेल. तुमच्या आयई ब्रावुजरमधे ती फाईल उघडेल. वर सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला मराठी मुळाक्षरे कशी टंकायची ह्याची जुजबी माहिती घेतली की, तुम्हाला मराठीत टंकता येऊ शकते. 
  • दुसरी आवडती प्रणाली म्हणजे- बरहा. ही तुम्हाला http://www.baraha.com/ वरुन उरतवून घेता येईल. सध्याचे व्हर्जन ८.० आहे. ह्यातील "सहाय्य" (हेल्प) फाईल खूपच मदत करते. ती अवश्य वाचा.

 

वरील प्रणाल्यांचा फायदा असा की, तुम्हाला ऑफलाईन - इंटरनेट-शिवाय ह्याचा वापर करुन आपले काम करुन ठेवता येते. सगळे झाले की, ह्यातून कॉपी करुन आपल्या वेबसाईटवर पेस्ट केले की काम संपले. 

बरहा मधे आपल्याला आपले काम सेव्ह करता येते. त्यासाठी तुम्हाला बरहाचा अधिक खोलवर अभ्यास करावा लागेल. 

वरील दोन्ही प्रणालींचा तोटा असा की, तुम्हाला छोटी-छोटी वाक्ये चॅट करतांना टंकायची असतील, तर ते तिकडे लिहिणे व वेब साईटवरील चॅट-विंडोमधे डकवणे खूप कटकटीचे ठरते. त्यामुळे शक्यतो अशा वेळेस, खालील तिसऱ्या प्रकाराचा वापर अधिक सोयीस्कर होऊ शकतो. 


तिसरा प्रकार म्हणजे, इंडीक प्लग-इन वापरुन आपल्या ब्रावुजर मधूनच ऐनवेळी टंकणे. 

फायर-फॉक्ससाठी गमभनचा प्लग-इन मिळतो. ब्राऊजरमधे प्लग-इन कसे इन्स्टाल करतात ह्याची माहिती तुम्हाला असल्यास हे काम दोन मिनीटात होऊ शकते. 

हे पहा- 

http://www.gamabhana.com/?q=node/32

 

 
सविनय,
मराठीशब्द
मराठीशब्द.कॉम



The INTERNET now has a personality. YOURS! See your Yahoo! Homepage.

__._,_.___
.

__,_._,___

0 comments:

sponsers