sponsers

Friday, December 25, 2009

[marathipeople] मराठी बाणा आणि राज साहेब यांच्यावरील कविता

 

 
मित्रानो नमस्कार,
 
आमच्या राज ठाकरे मराठी हृदय्साम्राट या ओर्कुट comunity तील एका thread मधील काही निवडक कविता आपल्यासाठी, आणखी बऱ्याच आहेत पण वेळेअभावी मोझ्क्याच कॉपी केल्या खालील लिंक ला क्लिक करून तुम्ही इतर हि कविता पाहू शकता
 
Source -:
 
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=10396851&tid=5211322156590170639
 
 
1)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी : सुरेश भट
 
 
2)
मी महाराष्ट्राचा
मी महाराष्ट्राचा
राज'नीती
मी मराठी मी मराठी
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी अस्तित्वासाठी...

बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी...

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे
मराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवून
मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता
मुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या
गुदमरलेल्या जीवासाठी ...
त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी
ही 'राज'नीती ....

3)
 
होता तो कोहिनूर हिरा
नाव त्याचं 'शिवाजी राजा'
महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमीं...त
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवा
 
 
4)
 
संदिप ताजणे...
संदिप ताजणे...
जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!!!!!!
"मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे."
"मी मराठी मी मराठी"
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?.....
दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...
दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...
ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी अस्तित्वासाठी...
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी...
पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे
मराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवून
मुंबई भार सहन करेल तरी किती?
मुंबईच काय, ते तर शिरलेत आता
मुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या
गुदमरलेल्या जीवासाठी ...
जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!!!!!!

मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही
आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपातील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही
 
5)
 
'राज ठाकरे'
चुकुनसुद्धा कधी तुम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका ,
मराठी माणसाला मुळीच लेचापेचा समजू नका ,

मराठी माणूस खेलण नाही ,
विस्तवाशी खेलु नका ,
पेटला तर तुमची राख करेल ,
हे तुम्ही लक्षात ठेवा ,

मराठीच्या अभिमानाला नख कधी लावू नका ,
मराठी माणुस वाघ आहे ,
उगाच त्याला दिवचु नका ,

धमकी नाही , इशारा नाही ,
ही आमची ताकीद आहे ,
दूसरा तीसरा कोणी नाही 'राज ठाकरे' पाठीशी आहे !!
-ट्विंकल देशपांडे
 
6)
 
मना-मनात 'राज' आहे
दिल्लीलाही हादरवन्याचि ताकद या मनगटात आहे ,
महाराष्ट्र नवनिर्मानासाठी 'राज' आज अटकेत आहे ,

दिसते तसे नसते हे खरेच आहे ,
मराठ्यांच्या ताकदीचा हा फ़क्त ट्रेलर आहे ,
खरा पिक्चर तर अजुन बाकीच आहे ,

महाराष्ट्र काबीज करण्याचा ,
कितीही प्रयत्न करा तुम्ही ,
पण लक्षात ठेवा, 'राज'राज्य आल्यावरती ,
तुमची काही धडगत नाही ,

वेडे तुम्हास वाटलो आम्ही ,
तर हो आम्ही आहोत वेडे ,
कारण म्हनटले आहे थोर पुरुषांनी ,
की, इतिहास घडवितात ती वेडी माणसेच ,

मस्तवाल राजकार्न्याना ,
महाराष्ट्राचा एकच सवाल आहे ,
कुणा-कुणावर बंदी घालणार ,
मना-मनात 'राज' आहे ,
मना-मनात 'राज' आहे .
-ट्विंकल देशपांडे
 
 
7)
सागर पाटील
'राज' सरकार
दिल्लीलाही हादरवन्याचि ताकद या मनगटात आहे ,
महाराष्ट्र नवनिर्मानासाठी 'राज' आज अटकेत आहे ,

दिसते तसे नसते हे खरेच आहे ,
मराठ्यांच्या ताकदीचा हा फ़क्त ट्रेलर आहे ,
खरा पिक्चर तर अजुन बाकीच आहे ,

महाराष्ट्र काबीज करण्याचा ,
कितीही प्रयत्न करा तुम्ही ,
पण लक्षात ठेवा, 'राज'राज्य आल्यावरती ,
तुमची काही धडगत नाही ,

वेडे तुम्हास वाटलो आम्ही ,
तर हो आम्ही आहोत वेडे ,
कारण म्हनटले आहे थोर पुरुषांनी ,
की, इतिहास घडवितात ती वेडी माणसेच ,

मस्तवाल राजकार्न्याना ,
महाराष्ट्राचा एकच सवाल आहे ,
कुणा-कुणावर बंदी घालणार ,
मना-मनात 'राज' आहे ,
मना-मनात 'राज' आहे .

जय हिंद!! जय महाराष्ट्र!! जय मनसे!!

सागर पाटील
 
 
8)
 
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,

क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राज ठाकरेची मराठी पोर गेली स्टॉलवर येऊन.

गणपतीच्या मिरवणुकीसारखी नाच नाच नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी,माझी बायको मात्र वाचली.

गाडी फुटली, चूल विझली, होत नव्हत गेले .
तिकिटासाठी म्हणून हातावर थोडे पैसे त्यांनी दिले.

कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.

हात ज़रा वर जाताच हसत हसत उठला.
अजुन नको मार मला एक प्रश्न मणी दाटला .
आपण सगळे भारतीय मग आमचा काय गुन्हा ?

मोडुन पडलाय आता संसार आणखी मोडू नका कणा.
म्हटलं, "मग सोडा युपी दिन,छट पूजा "
निकशुन सांगा तुमच्या नेत्याना
तुम्ही तिकडे यूपी अन बिहार मधे तुमची आय घाला!!!!!!
इथे तुमचे काय काम नाय

आन जोर जोरात रोज
'जय महाराष्ट्र' म्हणा..!" फक्त 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"
 
9)
 
आम्हाला आसा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे जिथे माज्या मराठी लोकाना वाटले पाहिजे ,
छत्रपति शिवाजी महाराज यांची शिव शाही पुन्हा आली आहे ....
आरे काय हा महाराष्ट्र होता ....आणी आता कसा जाला आहे ....
आरे येथे शेतकरी रोज आत्महत्या करीत आहे ,
महिला ,मुली सुरशित नाही .........
आरे काय चालू आहे........
ही परिस्धिती बदलली पाहिजे .......
पुन्हा शिव शाही आली पाहिजे ....
नव निर्माण जालेच पाहिजे ......
बाहेरचे लोक येथे येउन दादागिरी ,गुंडगिरी करतात .....
आमच्या नोकरी वर आपला हक्क सांगतात .....
येथे येउन माजले आहे ते .....

आरे आता तरी जागे व्हा .....

नाही तर मराठी मानुस या महाराष्ट्रा मधून कधीच हद पार होइल ......

पन मराठी मानुस आपली खेकडा वृति सोडायला काही तैयार नाही ........

आरे एकच मानुस आहे ,एकच वाघ आहे
तो म्हणजे " राज ठाकरे "

आरे या ....
त्याना साथ द्या .....
 
10)
 
ना सत्तेसाठी
ना राजकारणासाठी
ना मोठेपणासाठी
ना स्वार्थ साठी
जीव फक्त तडपतो
मराठी अस्मितेसाठी"
मी मी म्हणणार त्याना लोळवणारी
महाराष्ट्राची माती आहे.
खंजर ही ज्यात घुसनार नहीं आशी
राजसाहेबांची छाती आहे
******जय महाराष्ट्र****
 
11)
 
आता तरी उठ मराठ्या....
काम करायला
मराठी सुस्त,
भय्या चे भूत मग
डोक्यावर बसत.

एकदा का बसल,
की जायच नाव नाय,
मराठी बोलतो मग
आता करायचे काय?

नाही नाही बोलताना ,
बघा किती वर्षे गेली,
मराठमोळ्या मुंबईची
मजाच निघून गेली.

सहन नका करू आता,
करा तुम्ही प्रहार,
वेळ नाही लागणार बनायला,
महाराष्ट्राचा "बिहार"

जमेल ते काम करा,
आता कसली अहो लाज,
काळजी नका करू,
मागे उभा आहे "राज"

नाक्यावरती उभा राहून,
नको घालवू वेळ,
होईल तुझा शेतकरी,
खेळशील आत्महत्येचा खेळ.

पडेल ते काम कर मराठ्या
घालवू नको संधी,
मनसे घेऊन येतेय,
नव्या महाराष्ट्राची नांदी.
 
12)
 
मराठी दणका
खुप सहन केली
मराठी माणसाची व्याथा
आता या परप्रन्तियांच्या
कमरेत घालणार लाथा

तुम्ही दीडदमडीचे लोक
आम्हाला शिकवता देशभक्ति
ब्रिटिशांच्या विरुद्ध लढली
सर्वात जास्त मराठीशक्ती

खबरदार जर केली
नजर जरादेखील करडी
तर उगारलेल्या काठीवरच
बांधू आम्ही तुमची तिरडी

भारत देशासाठी सदैव
बलिदानास तयार मराठी
आमच्याच घरात घुसून धमकावाल
तर बसेल डोक्यात काठी

तुमची मातृभाषा कोणतीही असो
तुमचे कर्तव्य इथली संस्कृति जपणे
येथे तुम्ही मराठीचा आदर करा
एवढेच आहे मराठी माणसाचे म्हणणे

महाराष्ट्र.... मराठी मनांचा
जय मराठी!
जय महाराष्ट्र!
 
13)
 
प्रतिज्ञा मराठीची
मराठी ही माझी मातृभाषा आहे.

मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे.

माझ्या मायमराठीला मी सदैव मान देईन.

इतर सर्व भाषांचा, नेहमी आदर करीन.

त्या भाषा मायमराठीच्या, बहिणी आहेत.

जागतिक व राष्ट्रभाषा याबरोबरच मी मराठीचा देखील नेहमी वापर करीन.

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

मराठी भाषेचे आद्य सारस्वत माऊली ज्ञानेश्वरांपासून सर्वच मला वंदनीय आहेत.

महाराष्ट्राचे महत्व मराठी भाषेच्या विकासातच आहे, याची मला जाणीव आहे.

मराठी भाषेची जडणघडण प्रादेशिक बोलींमधील विविधता व त्यातून निर्माण होणारी भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

मराठी भाषेच्या विकासार्थ जास्तीत जास्त निदोर्ष बोलेन, लिखाण दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

महाराष्ट्र माझा आणि मराठी माझी यांची सदैव आठवण ठेवीन.

मराठीच्या विकासातच माझा विकास आहे. म्हणूनच मी मराठीच्या विकासार्थ झटेन.

मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे.

जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद!
 
 
14)
 
लालु,नितिश आणि पासवान,
कोकलुन,कोकलुन देतायेत सर्व देशाला आवाहान,
म्हणे महाराष्ट्रात बिहारींवर अन्याय झाला
बिहारींच्या बुध्दिवर म्हणे मराठी माणुस जळाला.
द्सरे काहि नाही यांचा मुम्बईचा रस्ता बंद् झाला, म्हणुनच यांच्या डोक्यात बिहारीभक्तिचा सुर्य उगवला.
एकटया "राजच्या" डरकाळीने यांच्या कारस्थानाला लागले गि-हान,
संपुर्ण महाराष्ट्र उठला तर यांना पळायला सगळा भारत पडेल लहान.

हे म्हणतात बिहारी सर्वात बुद्धिमान,
मग तिकडेच सुधारावा ना आपला बिहार का करता महाराष्ट्रात येउन घाण,
बिहारी नेते आहेत सडक्या मेंदुचे स्वामी,
त्यांच्या मंत्रिमंड्ळात सगळ्यांचीच गुन्हेगारीची पार्श्वभूमी,
बिहारात गायली जातात अराजकतेची गाणी,
आणि हे आम्हाला शिकविणार कायद्याची वाणी.

शिवरायांच्या राज्यात पुन्हा उत्तरेचं आक्रमण झाल आहे,
शांतिप्रिय मराठी माणसाने खुप आता सोसलं आहे,
शिवराज्य जाउन चारशे वर्ष झाली,
यांना वाटंल आता महाराष्ट्रात कोण आपल्याला अडवतं नाही.
"राज" नावाच्या राजासारखे अजुन आहेत म्हणाव जिवंत,
मराठीवर आण आल्यास नाहि करणार आम्ही जीवाची खंत.
मराठीच्या रक्षणासाठी बच्चा बच्चा पुढे सरसावतो आहे,
सावधान कंटंकांनो मराठी माणुस जागा होतो आहे.

- प्रसन्ना गोरे
 
 
15)
 
शिवाजींचा मावळा आहे मी,
बाजीरावांचा चाहता आहे मी,
मराठी शौर्य गाणार्‍या शाहिरीच्या
डफ़ावरची थाप आहे मी...

विठोबाची वीट आहे मी,
तुकयाचे गीत आहे मी,
मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे
तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,

अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,
मराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,
मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की,
मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...

मला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.मराठी माणसाने जातीपतिना गाडून एकवाटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही .
हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
इथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले पाहिजे.
इथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा.
इतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.
मराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.
........................................ .................................जय महाराष्ट्र
 
 
16)
 
महाराष्ट्राचा प्राण
महाराष्ट्राचा श्वास
महाराष्ट्राचे दैवत
"शिवाजी महाराज!"

महाराष्ट्र नाही
कुणाचा मोहताज,
पण बिहारी,भैय्यांना
चढलाय भलताच माज,

चांगलाच धडा त्यांना
शिकवायचाय आज,
त्यासाठी योग्य माथी
ठेवा महाराष्ट्राचा ताज,

महाराष्ट्राची आता
राखायला लाज
महाराजांच्या आशिर्वादाने
जन्माला आलाय 'राज'!

शिवजयंतीच्या निमित्ताने,
"छत्रपति शिवाजी महाराजांना"
मानाचा मुजरा !!

"जय भवानी !!"
"जय शिवाजी !!"
-ट्विंकल देशपांडे.

'स्व'राज्यच घडवायचय तुला,
'र'ममाण व्हायचय तुला
'रा'जा होउन काम करण्यात महाराष्ट्रासाठी,
'ज'ळणारे जळु देत , बोलणारे बोलू देत,

'ठा'कलास उभा असा त्यांच्यासमोर तू
'क'रणार आहेस तू , नक्की करशील तू
'रे' म्हणुनच म्हणते मावळे आम्ही नि
आमुचा राजा तू!!

-ट्विंकल देशपांडे.

होणार असेल लढाई
तर होउनच जाऊ दे आज,
मराठी माणसासाठी उभा आहे 'राज'.

उपर्यांची दादागिरी इथे चालणार नाही,
आणि मै आऊंगा बिऊंगा खपवून घेतले नाही.

'राज'ला साथ द्यायला अख्खा महाराष्ट्र सज्ज आहे,
त्याला एकटा समजनार्याननि आधी डोळे तपासून घ्यावे.

राजकारणातल्या म्हातार्यांची आता वाटच लागणार आहे,
कारण तरुणांच्या मनात 'राज',
'राज' आणि फ़क्त 'राजच' आहे .
-ट्विंकल देशपांडे

चुकुनसुद्धा कधी तुम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका ,
मराठी माणसाला मुळीच लेचापेचा समजू नका ,

मराठी माणूस खेलण नाही ,
विस्तवाशी खेलु नका ,
पेटला तर तुमची राख करेल ,
हे तुम्ही लक्षात ठेवा ,

मराठीच्या अभिमानाला नख कधी लावू नका ,
मराठी माणुस वाघ आहे ,
उगाच त्याला दिवचु नका ,

धमकी नाही , इशारा नाही ,
ही आमची ताकीद आहे ,
दूसरा तीसरा कोणी नाही 'राज ठाकरे' पाठीशी आहे !!
-ट्विंकल देशपांडे
 
 
17)
दिल्लीलाही हादरवन्याचि ताकद या मनगटात आहे ,
महाराष्ट्र नवनिर्मानासाठी 'राज' आज अटकेत आहे ,

दिसते तसे नसते हे खरेच आहे ,
मराठ्यांच्या ताकदीचा हा फ़क्त ट्रेलर आहे ,
खरा पिक्चर तर अजुन बाकीच आहे ,

महाराष्ट्र काबीज करण्याचा ,
कितीही प्रयत्न करा तुम्ही ,
पण लक्षात ठेवा, 'राज'राज्य आल्यावरती ,
तुमची काही धडगत नाही ,

वेडे तुम्हास वाटलो आम्ही ,
तर हो आम्ही आहोत वेडे ,
कारण म्हनटले आहे थोर पुरुषांनी ,
की, इतिहास घडवितात ती वेडी माणसेच ,

मस्तवाल राजकार्न्याना ,
महाराष्ट्राचा एकच सवाल आहे ,
कुणा-कुणावर बंदी घालणार ,
मना-मनात 'राज' आहे ,
मना-मनात 'राज' आहे .
-ट्विंकल देशपांडे.

अरे लाख प्रयत्न करा तुम्ही
सफल एकही होणार नाही
राज साहेबांना रोखू शकाल इतकी
तुमच्यात मुळी ताकदच नाही.

भले घाला भाषणबंदी,
कितीही पाठवा नोटिसा,
तुमच्या असल्या प्रेमपत्रांना
जा ! आम्ही भीक पण घालत नाही .

छळुनी आमच्या मराठी मनास
दुसरे आणखी काय मिळवाल ?
आज आहात,
उद्या होत्याचे नव्हते व्हाल!

पुरवून परप्रान्तियांचे चोचले,
करतोस त्यांचे लाड,
उत्तरप्रदेशदिन करुन साजरा
म्हणे,
शिवसेना करेल मराठीजनांचा प्रतिपाळ,
उध्दवा अजब तुझा कारभार !

फक्त महाराष्ट्रदिनच होईल साजरा,
भलते सलते काही चालवून घेणार नाही,
सरळ सांगुन कळत असेल तर ठिक,
नाहीतर तुम्हाला समजावणेही येते आम्हाला!

यापुढे महाराष्ट्रात असेल
फक्त एकच आवाज,
दुर्जनांचा करुनी नाश,
जो करेल महाराष्ट्र नवनिर्माण
तोच आहे आमचा हा
"मराठीह्रदयसम्राट राज!"
-ट्विंकल देशपांडे.

' रा 'जा तुज आम्ही मानीले
' ज 'नतेचा तू कैवारू

' ठा 'कला उभा पुढे
' क 'रण्या मराठीचे रक्षण
' रे ' दिलीस हाक तू
अन् आम्हीही आलो तत्क्षण ,
चल गाजवू रणांगण !!

-ट्विंकल देशपांडे .

राज आज काय बोलणार ?
अवघ्या महाराष्ट्राला
ही उत्सुकता आहे,
राज हाती यावी सत्ता,
सगळ्यान्चिच ही इच्छा आहे.

लढाईस तयार असलेले सैन्य,
जसे इशार्याची वाट बघते,
ऐकण्या त्यांचे भाषण
आम्ही आतुर झालो इतके,

आज पुन्हा एकदा ठाण्यात,
ही राज तोफ धडाडनार आहे,
माहीत आम्हाला इतुकेच,
की भल्या - भल्यांची वाट लागणार आहे !!!
-ट्विंकल देशपांडे.
 
 
18)
 
मनसेचा झेंडा फडकला,
पिंजऱ्यात वाघ अडकला...

मुंबई आहे मराठी माणसाची,
नाही कोणाच्या बापाची..........

ज्यानी लावली महाराष्ट्राची वाट,
ते काय आणणार नविन पहाट.....

सत्तेसाठी सातशे साठ........
महाराष्ट्रासाठी एकच मराठी ह्रदय सम्राट.....राजसाहेब ठाकरे....

मराठी माणसामध्ये केली भैयांची भिंत निर्माण,
हेच का तुमचे हिंदुत्वाचे पुराण......

जो आयुष्यभर राहिला अनपड गवार
तो काय करणार "मराठी द्रोहिंवर" 'प्रहार'?

ज्याला आहे भैयांनवर प्रेम,
तो काय करणार मराठीवर सप्रेम....

ज्याने ऐकले छट्पूजेत भैयांचे गीत,
तो काय करणार मराठ्यांचे हीत?

सदध्याच्या सुधारलेल्या राजकारणाला 'राज'कारण आहे!
आता फ़क्त महाराष्ट्रात "मराठी" करनच आहे!!!

राजसाहेब अंगार आहेत
बाकी सगळे भंगार आहेत!

मराठीचा झेंडा पेलायला शिवाजी महाराजांचा मर्द मावळा लागतो
ज्याला पेलवला नाही तो शिवसैनिकासारखा डोंब कावला होतो !!!!!

सिंहगर्जना झाली, आली रे आली मनसे आली...
जय भवानी, जय शिवाजी.............

 
 
 
धन्यवाद ! आपला 
 
राज समर्थक 

सचिन गायकवाड 

 
Mail -: sanch.gaikwad@yahoo.co.in; sanch.gaikwad@gmail.com
Orkut -: sachin.5041@gmail.com ;
http://www.orkut.co.in/Main#Profile?rl=mp&uid=4039937147574501942
http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=10396851
 
 
 
   

The INTERNET now has a personality. YOURS! See your Yahoo! Homepage. http://in.yahoo.com/

[Non-text portions of this message have been removed]

__._,_.___


.

__,_._,___

0 comments:

sponsers