sponsers

Wednesday, December 30, 2009

[Marathi_Katha] राज ठाकरे 'मटा नायक'

 

 
'मराठीपणा'चा एल्गार करीत मुंबईसह महाराष्ट्रात तुफान उठवून पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांची फौज उभी करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कामगिरीला 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांनी मन:पूर्वक सलाम केला आहे. २००९चे 'मटा नायक' म्हणून राज ठाकरे यांची निवड झाली असून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील यशस्वी उद्योजक व श्रीमंत भारतीयांच्या 'फोर्ब्स'च्या यादीत मराठी पताका फडकवणारे वीरेंद म्हैसकर यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे.
......

नववर्षाच्या पूर्वसंध्येला घेतल्या जाणाऱ्या 'मटा नायक' एसएमएस कॉण्टेस्टला दरवषीर् वाढता प्रतिसाद मिळत असून यंदा त्यासाठी ४५ हजाराहून अधिक एसएमएस आले. एकाच मोबाइलवरून एकापेक्षा अधिक एसएमएस केल्यास ते ओळखण्याचे तंत्र उपलब्ध असल्याने काही मते बाद ठरली. वैध मतांमध्ये सर्वाधिक मते राज ठाकरे यांना मिळाली; तर दुसऱ्या क्रमांकावर वीरेंद म्हैसकर यांची निवड झाली.

बंडाचा झेंडा फडकावीत शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर हजारांेच्या उपस्थितीत ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 'मनसे'ला राज्याच्या सर्व भागांतून आणि स्तरांमधून पाठिंबा मिळत होताच. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील मतदानाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. राज यांनी आतापर्यंत स्वत: कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. मात्र, 'मटा नायक' या एसएमएस कॉण्टेस्टच्या निमित्ताने मटाच्या वाचकांनी त्यांना भरभरून 'एसएमएस'मते दिली आणि त्यांच्या 'नायक'पणावर शिक्कामार्तब केले.

'मटा नायक'चे हे सहावे वर्ष. यंदाच्या कॉण्टेस्टमध्ये राज ठाकरे, उद्योजक वीरेंद म्हैसकर, 'एमएसआरडीसी'चे चीफ इंजिनीअर शरद सबनीस, सातही खंडांतील सवोर्च्च शिखरे सर करण्याची उमेद बाळगणारी कृष्णा पाटील, काँग्रेसला राज्यात यश मिळवून देणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, 'भाजप'चे महाराष्ट्रातील पहिले मराठी अध्यक्ष नितीन गडकरी, 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड, अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, 'हरिश्चंदाची फॅक्टरी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी, क्षयरोगासंदर्भात मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणारे डॉ. राजेश गोखले आणि साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आलेले वसंत आबाजी डहाके अशी निरनिराळ्या क्षेत्रांत कर्तृत्वाची मोहोर उमटवणारी मंडळी होती. 

 

धन्यवाद ! आपल 

 

राज समर्थक 

 सचिन गायकवाड 

untitled_10.jpg picture by dheeraj132

 

Mail -: sanch.gaikwad@yahoo.co.in; sanch.gaikwad@gmail.com

Orkut -: sachin.5041@gmail.com ;

http://www.orkut.co.in/Main#Profile?rl=mp&uid=4039937147574501942

http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=10396851

http://in.groups.yahoo.com/group/rajsamarthak/

 

 

   



The INTERNET now has a personality. YOURS! See your Yahoo! Homepage.

__._,_.___
.

__,_._,___

0 comments:

sponsers