sponsers

Saturday, February 28, 2009

[Marathi - Hyderabad] शिजीओ शिंजो: जपानीज थिंकर

वेगळा विचार:

३ दशकांपुर्वी शिजीओ शिंजो ही आसामी जपानच्या औद्योगिक जगतात एक थोर व्यक्ति म्हणून ओळखली गेली. त्यांनी जपानच्या औद्योगिक जगताला अनेक प्रकारे मदत केली. त्यांची मदत प्रामुख्याने उत्पादन क्षमता, गुणवत्ता वाढीसाठी जपान मधील अनेक कंपन्यांनी केला. तिथे त्यांची ख्याती व स्थान मानले गेल्यानंतर त्यांची कीर्ति अमेरिकेत जाऊन पोहोचली. त्याच संदर्भातील हा एक किस्सा.

ईलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवितांना कारखान्यातील उजेडाचे (प्रकाशरंग आणि त्याची तीव्रता) महत्व खूप असते. कामगारांना पुरेसा प्रकाश हा छोटे-छोटे ईलेक्ट्रॉनिक भाग जोडायलाच मदत करतो असे नसून त्यांचा दिवसभर उत्साह टिकून राहण्यासाठीही योग्य प्रकाशरंग आणि त्याची तीव्रता ह्याचे महत्व असते. अन्यथा ह्या उद्योगातील तज्ञांना असे आढळले की कामाच्या गुणवत्तेवर त्याचा निश्चित ऱ्ह्स्व परिणाम होतो. पीसीबी वर एखादा ई. भाग जुळणी करायचा राहून जाणे हे त्याकाळच्या ईलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱ्या कारखान्यातील नेहमीचा प्रकार होता. आता हे बहुतेक काम रोबॉट करतात. 

एका प्रसिद्ध अमेरिकन कंपनीला असे आढळले की, त्यांच्या कारखान्यातील गुणवत्ता ही काही केल्या सुधारत नव्हती. वर सांगितल्या प्रमाणे त्यांना क्यु. सी. मधे अनेकदा असे दिसून यायचे की, एखाद दुसरा ई. भाग लावायला कामगार विसरुन(!) गेला आहे. उजेड म्हणावा तर तो त्यांच्या नॉर्मपेक्षा जास्तच होता. मग असे का होते ते त्यांना कळेना. बरे, हा प्रकार सगळ्या कामगारांकडून होत असे. तज्ञ विचार करुन थकले व त्यांनी शिजीओ शिंजो ह्यांना पाचारण करावे असे सुचविले. 

शिजीओ शिंजोंनी त्या कारखान्याला भॆट दिल्यानंतर त्यांनी सगळी परिस्थिती पाहून, तज्ञांना सांगितले की, ह्या सगळ्यांचे कारण दिवेच आहेत. प्रकाशाची पुनर्रचना करण्यानेच ही अडचण सुटू शकेल. तज्ञ बुचकाळ्यात पडले. शिजीओ शिंजोंनी त्यांना, प्रयोग म्हणून कामगारांच्या कामाच्या टेबलावर दुधाळ रंगाची काच बसवायला सांगितले व दिवे त्यांच्या टेबलाखाली लावायला सांगितले व वरचे दिवे कमी करण्यास सांगितले. 
तसे केल्यामुळे, कामगाराला, पीसीबीवरील एखाद्या भोकात इ. भाग लावायचा राहिला आहे हे झटकन कळायचे. आणि काय, जेव्हा ही कल्पना त्या कारखान्यात सगळीकडे राबवली, तेव्हा ती अडचण पुर्णपणे नाहिशी झाली. 
 
Marathi Shabda 
www.marathishabda.com




Share files, take polls, and make new friends - all under one roof. Click here.

__._,_.___
Maratha tituka Melwawa.Maharashtra Dharma Wadhwawa -Jai Maharashtra
Recent Activity
Visit Your Group
Y! Messenger

All together now

Host a free online

conference on IM.

Yahoo! Finance

It's Now Personal

Guides, news,

advice & more.

Yahoo! Groups

Special K Challenge

Join others who

are losing pounds.

.

__,_._,___

0 comments:

sponsers