sponsers

Friday, January 8, 2010

$$ Marathi Masti $$ Raj Thakre: फोकस... मराठी माणूस आणि राज्याचा विकास!

 


FW :

 

 

धन्यवाद ! आपल 

 

राज समर्थक 

 सचिन गायकवाड 

untitled_10.jpg picture by dheeraj132

 

Mail -: sanch.gaikwad@yahoo.co.in; sanch.gaikwad@gmail.com

Orkut -: sachin.5041@gmail.com ;

http://www.orkut.co.in/Main#Profile?rl=mp&uid=4039937147574501942

http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=10396851

 

 

   

--- On Fri, 8/1/10, Rupesh Rane <ruperi@gmail.com> wrote:


From: Rupesh Rane <ruperi@gmail.com>
Subject: [maiboli] Raj Thakre: फोकस... मराठी माणूस आणि राज्याचा विकास!
To:
Date: Friday, 8 January, 2010, 6:29 AM

 
फोकस... मराठी माणूस आणि राज्याचा विकास!

* लोंढे रोखण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलायला हवीत?

देशाची घटना पूर्णपणे सक्षम असून त्यातील तरतुदी, नियमांची योग्य तह्रेने
अंमलबजावणी केल्यास मुंबईत कधीही लोंढे शिरू शकणार नाहीत. पण, दुदैर्वाने या सरकारी यंत्रणेत कोणाचीही जरब, दहशत नसल्याने मूळ उद्देशांनाच हरताळ फासला जातो. केवळ सरकारी मालकीच्या जागांवर कशी काय अनधिकृत बांधकामे होऊ शकतात? गोदरेजसारख्यांच्या शेकडो एकर जमिनी शाबूत राहत असताना सरकारी जमिनींवर मात्र अनधिकृत बांधकामे होतात हे गणित समजावून घ्यायला हवे. आपल्यावर कुऱ्हाड कोसळू शकेल, अशी भीती सरकारी अधिकाऱ्यांना नसल्यानेच हा प्रकार होतो.

* महाराष्ट्राची अस्मिता आणि विकास यांच्याविषयी तुमची भूमिका कोणती?
देश ही संकल्पना सर्वात मोठी असतानाच त्यात महाराष्ट्र आहे हे कसे काय विसरता येईल? महाराष्ट्राची अस्मिता आणि विकास या हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण, इथल्या विकासात स्थानिकांना काहीही स्थान मिळत नसेल तर तो विकास काय चाटायचा!

* मुंबईतील भीषण पाणीटंचाईवर उपाययोजना कोणती?
मुंबईतील लोकांना पुरेसे पाणी मिळत नसताना दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणावर इमारतींचे बांधकाम सुरू आहे. माझा स्वत:चा जरी बांधकाम व्यवसाय असला तरी तात्काळ सर्व बांधकामे थांबली पाहिजेत, असेच मी म्हणेन. मूलभूत सुविधा नसताना शहरावरील भार किती वाढवायचा याचा विचार झाला पाहिजे. सध्या 'स्टोरी ऑफ सिंगापूर' पुस्तक चाळतोय, तेव्हा त्यातून मुंबईच्या प्रश्ानंशी असलेले सार्धम्य लक्षात येेेते. एकेकाळचे सिंगापूर आणि आता त्याचे बदललेले स्वरुप हा इतिहास थक्क करणारा आहे.

* परप्रांतियांचे लोंढे रोखण्यासाठी काय करावे लागेल?
मुंबई राज्यापासून वेगळी करण्याचे षड्यंत्र असून ते कारस्थान आपण सर्वांसमोर मांडले आहे. उत्तरप्रदेश, बिहारमधून लोंढे प्रामुख्याने मुंबईत येत आहेत. त्यांना शहरात स्वत:चे मतदारसंघ निर्माण करायचे असून त्यादृष्टीनेच जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. एकदा का त्या डावपेचात 'ते' यशस्वी झाले की, तुमचे (मराठीजनांचे) अस्तित्त्व शिल्लक आहेच कुठे असा प्रश्ान् विचारायला देखील परप्रांतीय कचरणार नाहीत. ही स्थिती उद्भवू नये म्हणूनच आपला संघर्ष सुरू आहे. यासाठी घटनेत कोणतेही बदल घडवण्याची आवश्यकता नसून गरज आहे ती फक्त असलेले नियम राबवण्याची. म्हणूनच मी पुन्हा म्हणतो एकदा हातात सत्ता द्या आणि मग पाहाच...

* अनधिकृत झोपड्यांचा प्रश्ान् अनुत्तरितच राहतो त्यावर उपाय काय?
अनधिकृत झोपड्या उभारल्या गेल्यास त्वरित एखाद्या वॉर्ड ऑफिसरवर कारवाई केल्यास या प्रश्ानला आळा बसेल. सगळे अधिकारी सुतासारखे सरळ होतील. झोपड्या पाडल्या की किरकोळ कारवाई होते आणि पुन्हा झोपड्या उभ्या राहतात. त्यानंतर केवळ या प्रश्ानंवर चर्चा होत राहते. हे बंद व्हायला हवे.

* शिवसेनेेने ज्याप्रमाणे मराठीनंतर हिंदुत्त्वाचा मुद्दा घेतला त्याचप्रमाणे आपण भविष्यात नवी भूमिका स्वीकारणार का?
नाही. त्याची काहीच आवश्यकता नाही. माझा फोकस हा मराठी माणूस, महाराष्ट्राची अस्मिता आणि राज्याचा विकास या मुद्द्यांभोवती केंदीत आहे. त्यामुळे, नवी कोणतीही भूमिका घेणार नाही, हे उघड आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय निघाला की वाद होतात. पण, गुजरातमध्ये नरेंद मोदी गुजराती अस्मितेचा मुद्दा मांडून जिंकून येतात, तेव्हा त्यांना कोणीही आक्षेप घेत नाहीत.

* कोकणी मुस्लिमांना सोबत घेऊन सेक्युलरिझमचे धोरण स्वीकारणार का?
जेथे जेथे स्थानिक भाषिक मुस्लिम आहेत तिथे दंगे होत नाहीत. गुजरात असो की मुंबई-महाराष्ट्र त्यास अपवाद ठरणार नाही. पण, विशेषत: उत्तरप्रदेशमधून स्थलांतरित होणारा मुस्लिमवर्ग दंगलीत उतरत असतो. हज यात्रेसाठी मराठी मुस्लिमांना असलेला कोटाही परप्रांतीय मुस्लिम लाटत असल्याचे निदर्शनास आल्याने मनसेने आंदोलन केले. म्हणजे या ठिकाणीही स्थानिक आणि परप्रांतीय हा वाद आहेच ना! त्यासाठीही महाराष्ट्रातील स्थानिक मुसलमानांना संघर्ष करावा लागला.

* मनसेच्या आंदोलनांमुळे काही फरक पडला का?
'मराठीत बोलल्यावर तुम्हाला टॅक्सीत बसून नेतात' हा फरक आपण सगळेच अनुभवता आहात. रेल्वेमंत्री ममता बॅनजीर् यांची मराठीतून परीक्षा घेण्याची घोषणा, पोस्टमन परीक्षेत १०० टक्के मराठी भरती होते आणि हे सरकारचे कामकाज मराठीत चालेल असा आदेश काढावा लागला अशी अनेक उदाहरणे देता येतील. आतापर्यंत, मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येत नाही, असा जो भ्रम होता तो १३ आमदार निवडून आल्याने खोटा ठरला आहे, हे काही कमी यश आहे का!

* राहुल गांधी हेही युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही त्यांच्याकडे व त्यांच्या राजकीय वाटचालीकडे कसे पाहता?
राजीव गांधी यांनी देशात दूरसंचार क्रांती केली. त्यामुळेच आज मोबाईल, इंटरनेट यासारखी साधने भारतीयांना उपलब्ध झाली असून विकासाची अनेक दालने उघडली गेली. राहुल गांधी यांनीही आपल्या वडिलांप्रमाणेच भूमिका घेतली तर त्याचे निश्चितच स्वागत करावे लागेल.

* मराठी माणसांनी स्वत:त कोणते बदल करायला हवे?
मराठी माणसे घरगडी वा अशाप्रकारची कामे करत नाही, असा चुकीचा ग्रह जाणीवपूर्वक परप्रांतीयांकडून पसरवला जात आहे. वास्तविक मराठी मुले सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. गरज आहे ती त्यांना नोकऱ्यांची संधी माहित होण्याची. प्रत्येक क्षेत्रात उंची गाठलेल्या मराठी माणसाच्या कर्तृत्त्व पाहा ना, त्यातून हा सारा गैरसमज दूर होईलच. आपल्या माणसांना आपणच मोठे करायचे असते. सत्यजित रे यांची जयंती वा पुण्यतिथी असली की त्यांच्यावर भरभरून लेख येतात. पण, दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम यांच्यावर कधीही फारसे लेख आलेले नाहीत. त्यामुळे आपणच अशा वा इतर मोठ्या मंडळींचा जयजयकार करायचा आणि त्यांच्याकडून काही चुका झाल्याच तर प्रसंगी त्या पोटातही घालून घ्यायच्या.

* धकाधकीच्या वेळापत्रकात तुमच्या आवडीच्या व्यंगचित्रकलेकडे लक्ष देता येते का?
हे खरे आहे. तेवढे लक्ष देता येत नाही. शिवाय, कल्पना सुचतात पण व्यंगचित्र काढून ती छापणार कोण, हा प्रश्ान् उद्भवतोच ना!

* वृत्तपत्र, साप्ताहिक काढण्याची योजना आहे का?
साप्ताहिक ही संकल्पना आता मागे पडल्याचे माझे मत आहे. प्रसारमाध्यमे ज्या वेगाने पुढे जात आहेत, त्यात साप्ताहिकातील 'बातम्यां'चा केंदस्थान कमी झाले असून अधिकाधिक लेखाधिष्ठित झाले आहे. अशावेळी साप्ताहिकातून आपली भूमिका पोहोचवता येणार नाही. त्याशिवाय, वृत्तपत्र काढले तर त्याचा केंदबिंदू मी'च असल्याने ते पक्षाचे मुखपत्र होईल आणि तसे झाल्यास जाहिरातींपासून ते वितरणापर्यंत अशी सारीच गणिते चुकू लागतील. एकदा का ती चुकली की मग वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात आणि नेमके तेच मला टाळायचे आहे.

* चित्रपट नेत्यांना दाखवून मग प्रदशिर्त करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच नाही का?
चित्रपट निर्मात्याला आपण काय दाखवायचे याचे स्वातंत्र असलेच पाहिजे या मताचे आपण आहोत. मात्र त्याचा अतिरेक असता कामा नये. लोकशाही आणि निरक्षरता हातात हात घालून जाऊ शकत नाहीत. अमेरिकेतील याबाबतचे मापदंड येथे लागू करणे योग्य होणार नाही. ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट कुणीही दाखवू नका, अशी भूमिका घेतली नाही. मात्र सरकारनेच हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला.

* तुमचे आदर्श कोण?
छत्रपती शिवाजी महाराज, अॅडॉल्फ हिटलर...

* राजकारणात आला नसता तर कोण झाला असतात?
मला वॉल्ट डिन्सेच्या स्टुडिओमध्ये अॅनिमेटर म्हणून काम करायला आवडले असते. कॉलेजमध्ये असताना मला तशी इच्छा होती. विरंगुळा म्हणून रोज रात्री एक चित्रपट पाहतो. तो पाहत असताना इतर सर्व तणाव मी पूर्णपणे विसरून जातो.



The INTERNET now has a personality. YOURS! See your Yahoo! Homepage.

__._,_.___
.

__,_._,___

0 comments:

sponsers