आरोग्यविद्या : मराठी मल्टी मेडिया इ -पुस्तक : वेब अणि सीडी आवृत्ति प्रेषक डॉ.शाम अष्टेकर . भारत वैद्यक संस्था, २१, चेरी हिल्स सोसायटी, आनंदवल्ली , गंगापूर रोड, नाशिक.४२२०१३. फो. ०२५३ २३४२४४७ mobile: 09422271544 email: shyamashtekar@ लिंक :http://arogyavidya. ------------ सप्रेम नमस्कार ! आरोग्यविद्या हे मराठीतले अभिनव मल्टी मेडिया इ-पुस्तक आम्ही वेब आणी सीडी स्वरुपात या फेब्रुवारीच्या शेवटी सादर करीत आहोत. पूर्वीच्या आमच्या भारतवैद्यक या पुस्तकातली प्रकरणे यात अद्ययावत आणि जास्त सोपी केली आहेत. शिवाय नवीन विषयपण यात आहेतच. या पत्राखाली यातल्या ८४ प्रकरणाची यादी दिलेली आहे. या ई-पुस्तकाचे काम श्री माधव शिरवळकर यांनी त्यांच्या PUJASOFT या कंपनीमार्फत जवळजवळ पूर्ण केले आहे. या इ-पुस्तकात सुमारे 800 पाने (A4) आहेत. यातील 84 प्रकरणातून प्राथमिक आरोग्य-वैद्यकीय माहिती दिली आहे तसेच यात सुमारे 800 रंगीत चित्रे आणि फोटो आहेत. याशिवाय काही video क्लिप्स आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात १६ रोगलक्षणासाठी (ताप, चक्कर, डोकेदुखी, खोकला, जुलाब, पोटदुखी, छातीत दुखणे, पायावर सूज, अशक्तपणा, अवधाण, मूल खूप रडणे, स्त्रियांच्या अंगावरून रक्तस्त्राव, स्त्रियांच्या अंगावरून पांढरे पाणी जाणे) रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शक आहेत, आणि ते सर्व interactive म्हणजे संवादी आहेत, त्यामुळे प्रश्न विचारून सहज प्राथमिक रोगनिदान करता येते. शिवाय यात्त साठेक माहितीतक्ते दिले आहेत. सर्व प्रकरणे/ उपशीर्षके लीन्क्सने शोधता येतात त्यामुळे हे पुस्तक कोणालाही सहज वापरता येते.
हे इ-पुस्तक आरोग्य कार्यकर्ते, आरोग्यासंबंधी काम करणाऱ्या संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे-उपकेंद्रे, अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रे , आरोग्य प्रशिक्षण केंद्रे , स्वयंसेवी संस्था, शासकीय संस्था, माध्यमिक शाळा आणि आश्रम शाळा, परिचारिका, आशा, छोट्या गावातील डॉक्टर्स, जिज्ञासू वाचक, पालक, ग्रंथालये आणि आरोग्यशिक्षण करणाऱ्या सर्वाना अत्यंत उपयुक्त आहे.
युनिकोड च्या सोयीने आता वेब वर मराठी व्यवहार शक्य झाला आहे. याचा फायदा घेउन आम्ही सीडी बरोबर वेब-आवृत्तीही तयार करीत आहोत. या पुस्तकाचे एक प्रकरण नमुन्यादाखल सध्या आमच्या वेब साईटवर आहे. (लिंक: http://arogyavidya.
कृपया हे पत्र आपल्या मित्रांनाही पाठवावे ही विनंती.
आपले डॉ.शाम अष्टेकर (लेखक) अणि डॉ रत्ना अष्टेकर (सहलेखिका) . भारत वैद्यक संस्था २४ जानेवारी २०१० आरोग्यविद्याची वेब आवृत्ति सार्वजनिक उपयोगासाठी विनामूल्य आहे. त्याचे काम चालू आहे, पण निवडक भाग नमूना म्हणून पाहता येइल प्रकाशनानंतर (२० फेब्रुवारी २०१०) आरोग्य विद्या या सीडीसाठी देणगीमूल्य आणि पाठवण खर्च मिळून तीनशे रुपये आहे.
थेट अकाउंट मध्ये पैसे पाठवण्यासाठी खालील account चा वापर करावा .: भारतवैद्यक संस्था (Bharatvaidyaka sanstha), स्टेट बँक ऑफ इंडिया, गंगापूर रोड शाखा , नाशिक. बचत खातेक्रमांक ३०९७६८५८४३३. बँक शाखा क्र sbin0007497 , या बरोबरच आम्हाला ईमेल किंवा मोबाइल वर सन्देश पाठवावा. पत्र व्यवहारासाठी पत्ता डॉ.शाम अष्टेकर . २१ चेरी हिल्स सोसायटी , आनंदवल्ली गंगापूर रोड ,नाशिक.४२२०१३.फो ०२५३ २३४२४४७ (ज्या शासकीय/सेवाभावी संस्थाना आता फक्त सीडीसाठी मागणी नोंदवायची आहे त्यांनी कृपया वरील पत्यावर पत्र पाठवावे.) *(या कामात पहिल्या टप्प्यावर सुमारे ३ लाख खर्च येणार असून सोलापूरच्या श्रीमती वत्सलाताई लिम्बाले यानी आग्रहपूर्वक आणी स्वेच्छेने दिलेल्या निधीचा अपवाद सोडता हा ई-प्रकल्प सध्यातरी बहुश: वैयक्तिक निधिवर चालू आहे)
आरोग्यविद्या इ-पुस्तकाची 84 प्रकरणे परिपूर्ण आरोग्याची संकल्पना /आरोग्यमित्र/ आरोग्य शिक्षण /सामाजिक आरोग्य/महाराष्ट्राचे आरोग्य /देशाचे आरोग्य / देशोदेशीचे आरोग्य / व्यवसाय जन्य आजार /व्यसने /स्वच्छ पाणी/घर आणि/ परिसर स्वच्छ ता /घनकचरा व्यवस्थापन/ मलमूत्र व्यवस्था/ अन्नभेसळ/ न्याय वैद्यक /ग्राहक आणि रुग्णहक्क/ घरगुती हिंसाचार /शासकीय आरोग्यसेवा / खाजगी आरोग्यसेवा /अंगणवाडी/ राष्ट्रीय आरोग्य योजना /आरोग्य विमा योजना /राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान /वैयक्तिक आरोग्य /आरोग्यासाठी व्यायाम /आरोग्यासाठी / योगशास्त्र /आयुर्वेदिक पोषण शास्त्र /आधुनिक पोषण शास्त्र / शरीरशास्त्र /आजारांची कारणे /रोगप्रतीकार शक्ती आणि बरे होणे /संसर्गशास्त्र/ रोगनिदान / ताप / खास तपासण्या /आधुनिक औषधशास्त्र ............ |
0 comments:
Post a Comment