sponsers

Saturday, January 16, 2010

जरा विसावू या वळणावर


जरा विसावू या वळणावर

सकाळ वृत्तसेवा

Monday, November 16, 2009 AT 02:47 AM (IST)

Tags: features,   muktpeeth

आदल्या दिवशी चिठ्ठी लिहून ठेवली आणि नवीन फ्लॅटमध्येच गळफास लावून आत्महत्या केलीखरंच किती अविश्वसनीय ! आणि किती भयानक !! आजच्या तरुणांचं दारुण विश् या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं.
गौरी रोहित डबीरवारजे

तारीख 6 नोव्हेंबर 2009 सकाळी सकाळीच नागपूरहून फोन आलाकाल धनंजयनं आत्महत्या केलीऐकून पटकन खालीच बसलेगात्रं शिथिल होणंसुन्न-बधिर होणं म्हणजे नक्की काययाचा अनुभव त्याच क्षणी आलाधनंजय आणि आत्महत्याशक्यच नाही ! हातापायातलं त्राणच गेलंअचानक इतका मोठा धक्का !! काहीच सुचेना.

धनंजय आमच्या नागपूरच्या ग्रुपमधला मित्रअतिशय हुशारनेहमीच मेरिटमध्ये येणारास्मार्टआई-वडिलांचा एकुलता मुलगाकॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून आयटी कंपनीत नोकरी असलेला जबरदस्त पॅकेजमनपसंत बायकोदोन छोटी गोंडस मुलंस्वतःचे दोन फ्लॅट (स्वकष्टार्जितवर चढत चढत गाठलेलं उच्चपद इत्यादीसर्व भौतिक लौकिक सुखसोयीआमच्या ग्रुपमधलं एक यशस्वी व्यक्तिमत्त्वलहान वयातच सुख-समृद्धीकीर्तीचे शिखर गाठलेलापरदेशवाऱ्या करून आलेलासर्वांच्या हाकेला धावून जाणारा,नेहमी उत्कृष्ट सल्ले देणाराएक अतिशय समजदार विश्वासूहुशारपस्तिशीतला तरुण.

इतकं सगळं असताना अचानक आत्महत्यादोन दिवस नागपूरच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींशी बोलण्यात गेलेकाअसं काया प्रश्नांची उत्तरं शोधलीजाणून घेतली
दोन वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात एका कंपनीत असणारा धनंजय नागपूरला ब्रॅंच असणाऱ्या एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीत रुजू झालातिथं त्यानं आधीही काम केलं होतंचअत्यंत अनुभवीहुशार म्हणून त्याची गणना "टॉप'च्या मॅनेजर्समध्ये होत होतीआणि इथंच गणित चुकलंहळूहळू एका मागोमाग एक प्रॉजेक्ट् वाढत गेलीजबाबदाऱ्या अनेक पटींनी वाढल्या. 16-17 तास काम करूनही त्याला वेळ पुरेनासा झालाघरातही कुरबुरी वाढल्याकुटुंबाला वेळ अजिबात मिळेनासा झालाताणाची मर्यादा वाढतच होतीत्यातच सारखं बसून-बसून स्लिप डिस्कचा त्रास व्हायला लागलात्याची ऑपरेशन्स झालीकंपनीतील ताणकामाची वाढती जबाबदारी त्याला आता असह्य होऊ लागली

मधूनच कधीतरी त्यानं घरीमित्रांपाशी नोकरी सोडण्याचा विषय काढलापण सगळ्यांनी थट्टेवारी नेलंएवढी प्रतिष्ठेची नोकरीसुरळीत सुरू असलेलं करिअरसमाजातलं स्थान... साहजिकच "नोकरी सोडअसा सल्ला एकदम कुणीच देणार नव्हतंपण सर्वांनी त्याला काम कमी करायलाझेपेल इतकीच प्रोजेक् घ्यायला सांगितलंविश्रांतीचा सल्लाही दिलापण जबाबदाऱ्या इतक्या होत्याकी त्या झटकून टाकणं त्याला जमलं नाहीदुसऱ्या कुणाच्या खांद्यावर देण्यासारखा खांदाही सापडत नव्हताइकडे कामाचे तास वाढतच चालले होतेघरी असतानाही तो लॅपटॉप घेऊनच दिसू लागलाकामप्रेशरताण दिवसेंदिवस वाढतच होता आणि अचानक त्यानं निर्णय घेतलास्वतःला संपविण्याचा.
 
आदल्या दिवशी चिठ्ठी लिहून ठेवली आणि नवीन फ्लॅटमध्येच गळफास लावून आत्महत्या केलीखरंच किती अविश्वसनीय ! आणि किती भयानक !! आजच्या तरुणांचं दारुण विश् या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंत्यानं जे केलं ते चूकचमागचा पुढचा विचार  करतातरुण बायकोला कोवळ्या मुलांनाविधवा आईला असं एकटं सोडून जाण्याच्या त्याच्या मार्गाचं समर्थन कुणीच करणार नाहीपण एवढं सुंदर  समृद्ध आयुष्य संपवून टाकायचं..... इतक्या टोकाचा निर्णयइतका उद्वेग आणि इतकी असहायता त्याच्यात कुठून आलीरोगीअपयशीज्यांच्या आयुष्यात काहीही उरलेलं नाही आणि काही होऊ शकणार नाहीअशांच्या आत्महत्यांबद्दल आपण बऱ्याचदा वाचतोपण केवळ वाढत्या जबाबदाऱ्या ताणतणावयांमुळे स्वतःचं परिपूर्ण आयुष्य संपवणं आणि इतरांच्याही आयुष्यात अंधार निर्माण करणं हा अविचारच !

कुठलंही कामप्रॉजेक्कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकनयुरोपियन क्लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाहीतुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्याकंपन्या आहेतत्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाहीमनात विचार आला की या कारणामुळे जर धनंजयसारखा समंजसविचारीकुटुंबवत्सल तरुण या इतक्या टोकाच्याअविचारी निर्णयापर्यंत पोचला असेलतर आजकालचे कितीतरी तरुण या अशाच अवस्थेमधून जात असतील

बहुतेक जण या अग्निदिव्याला यशस्वीपणे सामोरे जातातजातही आहेतपण त्यांतले काही मनस्वीदुबळे भावनाशील तरुण.... त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवू शकतेकुणास ठाऊक किती जणांच्या मनात असे विचार कधीतरी का होईना डोकावत असतीलकुठल्यातरी तात्कालिक कारणासाठी जोड मिळून ते प्रत्यक्षात उतरवायला त्यातले काही जण धजावतीलही ! मागे अशाच स्वरूपाच्या "आयटीतरुणांच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या होत्यापण जोपर्यंत त्याची झळ आपल्या भावविश्वापर्यंत येत नाहीतोपर्यंत त्यातली धग तितकीशी जाणवत नाहीहेच खरं.

या निमित्ताने या किंवा अशाच फेजमधून जात असणाऱ्या माझ्या मित्रांनोइथे मैत्रिणींनो म्हटलेलं नाहीकारण मुली या मुलांपेक्षा जास्त स्ट्रॉंगचिवट असतातसगळ्याच मॅनेजमेंट (स्ट्रेस मॅनेजमेंटसहमध्ये त्या मुलांपेक्षा जास्त हुशारही असतातत्या रडून भांडूनकुणाजवळ तरी बोलून आपला रागसंतापदुःखक्षोभ व्यक्त करतातकित्येक मुलांना मात्र हे जमत नाहीइगोप्रतिष्ठासमाजातलं स्थानपुरुष म्हणून असलेलं ओझंकुटुंबप्रमुखपदाचं दडपण अशा अनेक गोष्टी त्यांना असं करण्यापासून परावृत्त करतातत्या माझ्या मित्रांनोकाही गोष्टी केवळ मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला सुचवाव्याशा वाटतातजेणेकरून अशी वेळ कुणावरही येऊ नये-

कृपा करून जमेलझेपेल एवढंच काम हातात घ्यात्यासाठी आग्रह धराप्रतिष्ठापोस्टवाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने  झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नकातुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाहीयाचं भान ठेवाकुटुंबाला वेळ द्याघरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं.

ऑफिसमधले ताणतणावस्पर्धापक्षपात घरी घेऊन  येतातिथंच विसरून या.
स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्याही भयानक स्पर्धा कधीही  संपणारी आहेतुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.

कितीही ताण असलाकुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगातुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाहीयाबद्दल खात्री बाळगा
ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडीलजीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवात्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.

तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपास्वतःसाठी थोडातरी वेळ काढासंगीतव्यायामयोगासनेवाचन .चा उपयोग कराहे सगळं सगळ्यांनाच माहिती असतंतरीही आपण धावतोऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.

आज माझ्या मित्राच्या कुटुंबीयांवर आलेली वेळ कधीही कुणावरही येऊ नयेहीच कळकळीची इच्छा आणि म्हणूनच हा लेखनप्रपंचअसं वाटतंधनंजयनं थोडा ब्रेक घेतला असताकुठंतरी क्षणभर विसावला असतातर त्याच्याही मनावरचं मळभ दूर झालं असतंआपण त्या क्षणी त्याला साथ द्यायलात्याला समजून घ्यायला कमी पडलोही खंतहीपण हे वाचून कुणा एकानंही आपल्या जगण्याचा मागोवा घेतलाक्षणभर थांबून विचार केला तरी मी स्वतःला कृतार्थ समजेन.


0 comments:

sponsers