महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | Upto :4.15 | |
जाहिर झालेले निकाल ( ) | ||
जिंकलेल्या जागा | आघाडीवर | |
कॉंग्रेस-राष्ट्रवादी | 131 | |
87 | ||
मनसे | 13 | |
रिडालोस | 12 | |
इतर | 26 |
मराठी माणूस शिवसेनेपासून दुरावला आहे हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. मराठी माणूस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राज ठाकरे यांच्याकडे अधिक आशेने बघतो आहे ही बाबही या निकालाने अधोरेखित केली आहे.
काँग्रेसने गचाळ कारभार करूनही मतदारांनी तोच पर्याय पुन्हा निवडला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण दगडापेक्षा वीट मऊ असे मतदारांना वाटते आहे हेही सिद्ध झाले. काँग्रेसची आघाडीची जोडी, सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्याकडे बघून मतदारांनी मतदान केले आहे.
शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हितासाठी झाला तरी, गेल्या काही वर्षांत संघटनेने हिंदुत्वाची पताका हाती घेतली. आपला पाया व्यापक करण्याच्या प्रयत्नात मराठी माणसाच्या बाजूने उभे राहण्याचे टाळले. याचा फायदा राज यांनी घेतला. राज यांच्या कार्यर्कत्यांनी कल्याण येथे, रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ला चढवला तेव्हा राज शिवसेनेत होते. पण राज यांना या कृत्यामुळे मिळालेला पाठिंबा लक्षणीय होता. दुदैर्वाने याची नोंद उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही. पक्षावर आपली निविर्वाद पकड असावी असे त्यांचे प्रयत्न होते. यातूनच राज यांनी स्वत:चा पक्ष स्थापला. शिवसेनेने हिंदुत्वाला महत्त्व दिले असले तरी या वर्गातही ते प्रतिमा बनवू शकले नाहीत. मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवूनही शिवसेना त्याचे भांडवल करू शकले नाही. पाकमध्ये हिंदु भरडले जात आहेत अशा बातम्या येत असूनही शिवसेनेने त्याबाबत ठोस भूमिका घेतली नााही. २६ नांव्हेंबर २००८च्या हल्ल्याबाबत प्रधान समितीचा अहवाल फोडून त्याचा राजकीय फायदा घेण्फाइतके चातुर्य पक्ष दाखवू शकला नाही.
राज यांना पहिल्या दिवसापासून प्रचंड पाठिंबा मिळत होता. मतदार काय विचार करताहेत हे दिसत होते. राज यांनी काँग्रेसची सुपारी घेतल्याचे आरोप उद्धव यांनी करूनही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला नाही हे स्पष्ट आहे. राज यांच्यामुळे मराठी मतांचे विभाजन झाले हे उघड आहे, पण गुळमुळीत शिवसेनेपक्षा राडेबाज मनसे त्यांना अधिक भावली.
मराठी माणसाला दीर्घ काळ शिवसेनेचा आधार वाटत होता. शिवसेेनेची शाखा ही सर्वसामान्य माणसाला धीर द्यायची. पण हे चित्र बदलण्यात, १९९५ साली शिवसेनेकडे महाराष्ट्राची सत्ता येणे कारणीभूत ठरली. हा विरोधाभास आहे, पण यानंतर सैनिक सुखवस्तू बनला. तो आता शाखेऐवजी बारमध्ये दिसू लागला. शाखांकडे सर्वसामान्य माणूस फिरकेना. पक्षात नेते एसी गाडीतून फिरू लागले. त्यांना बंद खिडकीतून सामान्य माणसाची दु:खे दिसेनाशी झाली. अनेक नेत्यांनीच नव्हे तर कार्यर्कत्यांनी बिल्डर बनण्यात भूषण मानले. हा बदल पक्षाच्या हायकमांडला दिसत नव्हता की काय अशी शंका वाटू लागली.
एकीकडे हे चित्र असताता शिवसेनेचा मित्रपक्षही गलीतगात्र बनत होता. त्यांचे हायकमांड वाढत्या वयामुळे लढण्याची इर्षा गमावून बसले होते. गोपिनाथ मुंडे आणि नितीन गडकरी असे दोन स्पष्ट गट महाराष्ट्र भाजपामध्ये पडले होते. यात भर पडली ती प्रमोद महाजन यांच्यावर गोळया झाडणारे प्रवीण महाजन यांनी केलेले काही गौप्यस्फोट. याच थेट परिणाम मतदारावर झाला नसला तरी, भाजपाची प्रतिमा डागाळण्यात हे आरोप यशस्वी झाले.
या सगळया धुमश्चक्रीत, काँग्रेस यशस्वी का ठरली याचा विचार व्हायला हवा. हा पक्ष कायम आम आदमीची भाषा बोलत राहीला. इंदिरा गांधी यांनी, गरीबी हटाव अशी घोषणा दिली आणि मतदारांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे खेचला. सोनिया गांधी आणि मनमोहन यांच्यासह राहुल गांधी यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला कारण त्यांनी शिवराळपणा करण्याचे टाळले. कायम ते गरीबांचे हित, विकास अशी भाषा बोलत राहीले हे लक्षात घ्यायला हवे.
राजकारणात एकदा अपयश मिळाले म्हणजे सर्व काही संपले असे नव्हे. शिवसेनेने, उद्धव यांनी शांतपणे विचार करायला हवा की आपला नक्की मतदार कोण आहे? मराठी माणसाला टाळून आपण यश मिळवू शकतो का? आपण प्रादेशिक पक्ष आहोत की राष्ट्रीय पक्ष? कारण प्रादेशिक पक्षाला विशिष्ट भूमिका घ्यावी लागते. प्रादेशिक अस्मिता जपणे हा त्यांच्या केंदबिंदू असावा लागतो. देशभरातल्या प्रादेशिक पक्षांवर नजर टाकली तर ही बात स्पष्ट होते. आंध्र प्रदेशात तेलगू देसम, बंंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पंजाबमध्ये अकाली दल, ओरिसात बिजू जनता दल, तामिळनाडूत दमुक आणि अण्णा दमुक हे आपापल्या इलाख्यात यशस्वी ठरतात कारण ते कायम स्थानिक प्रश्ानंना प्राधान्य देतात. त्यांच्या यशाचे ते गमक आहे.
शिवसेनेने मराठी माणूस हा मुद्दा सोडला आणि पक्षाची लोकप्रियता कमी होऊ लागली. आता हा मुद्दा ते मांडू लागले तर राज ठाकरे यांचे ते अनुकरण करतात असे होईल. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांंवर शिवसेनेचा झेंडा फडकतो आहे, पण या दोन्ही शहरात मराठी माणूस मार खातो आहे. त्यांचे रक्षण करण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे अशी भावना वाढीस लागली आहे.
आता मनसेचे आमदार काय कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण सत्ता ही केळीच्या सालीसारखी असते. माणूस तिच्यावरून कधी घसरेल हे सांगता येत नाही. तसे झाले तर मनसेही फार काळ तग धरू शकणार नाही. तेव्हा मराठी माणसाचे काय होईल?
__._,_.___
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment