नवसाला पावणारी एकवीरा आई
श्री एकवीरादेवी. मुंबई-पुणे मार्गावर लोणावळ्यापासून ११ किमी अंतरावर कार्ल्याच्या डोंगरावर एकवीरा देवीचे स्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी पाय-यांनी डोंगर चढून जावे लागते. पण डोंगर चढताना दिसणारा इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर , लोहगड , तुंग असे गडकिल्ले हा सारा परिसर मन मोहून घेतो. हिवाळ्यात वा पावसाळ्यात हिरवाकंच असलेला हा परिसर अगदी वेडावून टाकतो. डोंगर चढायचा त्रास घ्यायचा नसेल तर मंदिरापासून काही अंतरापर्यंत थेट गाडीनेही पोहोचता येते.
या एकवीरा देवीची एक अख्यायिका अशी की , आदितीने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने तिला वर दिला की इश्वाकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. तुला होणा-या पाच पुत्रांत एक पुत्र महावीर असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकवीरा म्हणून ओळखली जाशील.
अशा या एकवीरा देवीचे हे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे. सीकेपी किंवा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचीही ही देवता असल्याचे मानतात. एकवीरा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी आई म्हणून ती ओळखली जाते. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी एकवीरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. लग्न असो वा मंगल कार्य , कोळी बांधव सर्वात आधी एकवीरा आईला आमंत्रण देतात. अगदी मासेमारीचा मोसम सुरु होण्याआधी एकवीरा आईची आराधना केली जाते. एकवीरा आई प्रसन्न झाली की , तिचा नवस फेडण्यासाठी कोंबडा कापण्याची प्रथा आजही कोळी समाजात आहे.
सह्याद्रीच्या डोंगरद-यात शिवरायांच्या स्फूर्तीदायक इतिहासाच्या पाऊलखुणा जशा अद्याप कायम आहेत त्याचप्रमाणे बौद्धकालीन युगाच्या खुणाही अनेक लेण्यांमध्ये विसावल्या आहेत. श्री एकवीरा देवीच्या मंदिराशेजारीच जगप्रसिद्ध कार्ला लेणीही आहेत. बौध्द भिख्खूंनी बांधलेली ही पुरातन लेणी वास्तुकलेचा अजरामर इतिहास जोपासत आहे. ख्रिस्तपूर्व दुस-या शतकात ती बांधलेली असावीत , असा अंदाज आहे.
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment