sponsers

Wednesday, April 1, 2009

[GarjaMaharashtraMaza] श्री रेणुका आणि एकविरा देवी

श्री रेणुका आणि एकविरा देवी
श्री रेणुका आणि एकविरा देवी या दोन्ही देवता एकच आहे. एकचीच दोन नावे असल्याची पुराणकथा प्रसिद्ध आहे. या पुराण कथेमध्ये रेणू राजाने गंगेच्या काठी फार मोठा यज्ञ केला. वेदमंत्रांनी हवन केले. त्यामुळे अग्निनारायण संतुष्ट झाले.

या यज्ञातून दिव्य वस्त्र परिधान केलेली कल्याणमुखी चंदनाची उटी लावलेली दिव्य अलंकार घातलेली महालक्ष्मीप्रमाणे विशाल नेत्री व गंगेसारखी पवित्र असणारी अद्वितीय शक्ती कन्येच्या रूपाने प्रकट झाली. लगेच देवमुनींनी पुष्पवृष्टी केली. देवमुनींनी एकवीरा- एकवीरा म्हणून जिचा घोष केला हीच ती एकविरा होय. 

रेणू राजाने यज्ञ केला व त्या यज्ञातून श्री एकवीरा प्रकट झाली. तोच तिचा पालक होता. म्हणून रेणू राजाची कन्या म्हणून तिला रेणुकासुद्धा म्हणू लागले. यावरून श्री एकवीरा आणि श्री रेणुका ही एकीचीच दोन नावे आहेत असे स्पष्ट होते. रेणुकादेवी संबंधी व एकविरादेवी संबंधी वेगवेगळ्या क्षेत्रीय लोककथा प्रसिद्ध आहेत.


Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Get in Shape

on Yahoo! Groups

Find a buddy

and lose weight.

Yahoo! Groups

Stay healthy

and discover other

people who can help.

Group Charity

Stop Cyberbullying

Keep your kids

safe from bullying

.

__,_._,___

0 comments:

sponsers