एकविरा आई तू डोंगरावरी
नवसाला पावणारी , कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात वेगळेच स्थान आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थात , प्राचीनता आणि तिचं लोभसवाणं रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे.
एकविरा देवीचा महिमा जसा आगळा तसंच तिचं स्थानही. कार्ल्याच्या लेणीमध्ये या देवीचे मंदिर असून देवळाच्या भोवती निसर्गही सिद्धहस्ते वंदन करत आहे. कार्ल्यामध्ये ह्या देवीचे मंदिर आहे. लोणावळयापासून ११ किमीवर ह्या देवीचे स्थान आहे. देवळाच्या सभोवती घनदाट झाडी , पांढरे शुभ्र धबधबे आणि थंडगार आनंदी वातावरण असे निसर्गाचे वरदान लाभले आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते. पण डोंगर चढताना दिसणारा इंदायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर , लोहगड , तुंग असे गडकल्ले हा परिसर मोहून घेतात.
एकविरा देवी रेणूकेचे रूप आहे. या देवीची एक अख्यायिका आहे. आदितीने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने तिला वर दिला की इश्वाकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. तुला होणाऱ्या पाच पुत्रात एक पुत्र महावीर असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकविरा म्हणून ओळखली जाशील. चांदसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) आणि कोळी समाजात या देवीला विशेष स्थान असले तरी सामान्य पर्यटकांपासून ते भक्तगणांपर्यंत सर्वांच्या मनात नवसाला पावणारी देवी म्हणून ' एकविराआई ' ची प्रतिमा आहे.
एकविरेचे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वाच भाविकांची ती स्फूतीर्देवता आहे. देवीचे मंदिर अत्यंत प्राचीन आहे. आणि कार्ल््याच्या लेणीत तिचे मूळ स्थान आहे. नवरात्रामध्ये या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गदीर् होते. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धामिर्क कार्यक्रम आयोजित केले जातात. नवमीच्या दिवशी पहाटेच महानवमी होमाला सुरुवात होते हा दिवस भक्तांसाठी परमोच्च असतो. नवसाला पावणाऱ्या या देवीच्या उत्सवात भक्तीचा पूर वाहत असतो. मंदिर भक्तगणांनी भरलेले असते दर्शनासाठी लांबच लांब रांग लावून भक्त उभे असतात. देवीची पूजा , आरती आणि नित्यपाठच्या वेळाही ठरलेल्या असतात. गावकऱ्यांच्यादृष्टीनेही हा देवीचा उसव म्हणजे दिवाळीच असते.
नऊ दिवस उत्सवाचे आणि त्याआधी व नंतर तयारीचे म्हणून धांदलीत असतात. गावात येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला निवास आणि प्रसाद मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि गावकरी उत्सवाच्या आधीपासूनच तयारी करत असतात.
कोळी समाजाच्या लोकांची उत्सवाच्या काळात विशेष गदीर् असते. प्राचीन कालीन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख असली तरी बुद्ध कालीन लेण्यांच्या निर्मितीचा बाजही या देवळावर आढळतो. परदेशातून येणारे पर्यटक , लेण्या बघायला येणारे ट्रेकर्स सर्वच जण देवीच्या दर्शनाशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. लोणावळयापासून ११ किमीवर असलेल्या या देवस्थानाला येण्यासाठी कार्ला स्टेशनला उतरून पुढे चालत जावे लागते. त्यानंतर डोंगर चढून उंचावर असलेल्या या देवीचे दर्शन घ्यावे लागते. तिचे मूळ स्थानच कार्ल्याच्या लेणीत असल्याने भक्तगणांचे पाय आपोआपच या डोंगराकडे वळतात. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टतफेर् येणाऱ्या भक्तांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच नवरात्र महोत्सवाची जबाबदारीही या ट्रस्टतफेर्च सांभाळली जाते. भक्तांसाठी येथे निवासाचाही व्यवस्था असून प्रसादही ट्रस्टतफेर् दिला जातो.
डोंगरातलं स्थान , प्रसन्न रूप , जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्त्व असलेल्या या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्तांने एकदा तरी डोळयात साठवून घ्यायला हवे.
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment