sponsers

Sunday, January 2, 2011

[GarjaMaharashtraMaza] Chaha Pohe

 

मुली 'पाहण्या-बिहण्याच्या' अनुभवाविषयी भावनेच्या भरात बरंच काही बोलून बसलो नसतो तर आज हा लेख लिहिण्याची वेळ माझ्यावर आली नसती..!
पण आता नसती आफत गळ्यात मारून घेण्याची इतकी सवय झाली आहे; म्हटलं लिहावं. लडेंगे दुसरं काय ?

सुखात चाललं होतं सगळं. नोकरीबिकरी, पाच आकडी पगार, पुण्यात घर, बँकेत पैसे.
त्यात मी म्हणजे एकदम सुयोग्य स्थळ, एकुलता एक मुलगा. आईबाप कोह्लापुरात, कसली जबाबदारी नाही, पुण्यात 'वेगळेच' राहणार दोघं इ. इ. बरीच क्वालिफिकेशनची लेबलं माझ्या नावावर चिकटली होती.
आमच्या वयाची पंचवीस-सव्वीस वर्षे उलटून गेल्यावर आमच्या मातोश्रींनी लग्नाची भुणभूण सुरु केली..
तोपर्यंत त्या वाट पाहत होत्या की मी प्रेमात पडेन आणि एक दिवस घरी पोरगीच घेऊन येईन. पण तसं काही झालं नाही..
त्यामुळे आपल्या काट्यार्ला एवढंही जमलं नाही म्हणून पूज्य माताजींनी पिताजींना वेठीस धरलं आणि कुठं कुठं जाऊन नावं नोंदवायला सुरुवात केली.
तरीही मी सुखातच होतो. डोक्याला ताप नव्हता, लग्न करण्यासाठी काही गुडघ्याला बाशिंग बांधून धावावं असं वाटत नव्हतं.
नाही म्हणायला मैत्तिणी चिक्कार होत्या, पण त्यांच्यापैकी एखादीशी लग्न करावं असं नाही वाटलं. मैत्तिणी म्हणून त्या मस्तच होत्या, पण बायको म्हणून ?-छ्या..!!
(
आणि ज्यांना मी विचारलं त्या मला 'नाही' म्हणाल्या.. हे कारण वेगळंच..)
मग नाईलाजास्तव आमचं गाडं ' पोरी पाहण्याच्या' आणि चहा-पोह्याच्या टप्प्यात गेलंच..!
वर्षभर चालला दर रविवारी मुली पाहण्याचा कार्यक्रम. महाबोअर असतो तो प्रकार. मुली फार आरडाओरडा करतात की आम्हाला 'पहायला' कसले येता, आम्ही काय प्रदर्शनातल्या वस्तू आहोत का ?
पण दर रविवारी मुलगी पहायला गेलं ना तर कळतं की आपल्याला काय काय पहायला आणि ऐकायला लागतं.
काय वाट्टेल ते विचारतात मुलीचे बाप. आता मी 'आयटीत' काम करतो, तर ते 'आयटीत' विचारतात की ओबामाने आऊटसोर्सिंगला चाप लावला तर तुमची नोकरी जाईल का? असं काहीही वाट्टेल ते प्रश्न आणि वाट्टेल ती उत्तरं देत वेळ मारून नेणं..! त्यात एखादी तोंडातून चकार शब्द काढत नाही, एखादी इतकी बोलते की थांबतच नाही. एखादी फोटोत देखणी दिसते, प्रत्यक्षात इतकी मंद.. की अरेरे. वर्णन केलेलं असतं सडपातळ म्हणून; पाहिल्यावर कळतं की हा तर भोपळा !
त्या प्रकाराला मी कंटाळलो.. आणि म्हटलं की घरीबिरी नाही, बाहेरचं भेटू..?
एकदा असंच एका मुलीला पत्ता सांगितला, अमूकतमूक जवळच्या 'मॅकडी'त ये म्हटलं सहा वाजता भेटायला..
सात वाजून गेले तरी पत्ता नाही..
साडेसात वाजता फोन आला ,पुण्यात 'मॅकडी' पूल कोणत्याच रिक्षावाल्याला माहिती नाही, सांगा कसं यायचं ?'
बोला आता ! पुण्यात राहणाऱ्या ज्या मुलीला साधं मॅकडोनाल्ड उर्फ मॅकडी हा शब्द माहिती नाही, तिच्यात काय 'पहायचं'?
तरी आम्ही भेटलो. तिला मी पसंत. घरचे तयार..
पण मी 'नाही' म्हणालो.
माझा जन्म चाललाय मॅकडीत आणि सीसीडीत..माझं सगळं जग असंच फिरतंय आणि ती टिपीकल तुळशीबाग छाप.. कसं जमायचं आमचं? लाईफस्टाईल आणि आवडीनिवडी म्हणून काही जुळायला हवं की नाही?
पण असा विचार नाही करायचा..? तो आईबाबांना पटत नाही.
खरं सांगतो, आमचंही त्रांगडं सुटत नाही. आम्हाला आमच्याबरोबर वावरणाऱ्या मॅकडीवाल्या मैत्तिणी बायको म्हणून नकोत, त्या जरा अतीच शहाण्या वाटतात. आणि जिला मॅकडी माहिती नाही ती ही नको, कारण ती बावळट वाटते. मग आधुनिक अधिक घरेलू, स्वतंत्र अधिक आज्ञाधारक, देखणी अधिक समजंस अधिक आईलाही आवडणारी असं समीकरण आम्हाला कुठे हो गावणार?
ते गावायसाठी काय काय नाही केलं ?
पोरी पाहिल्या. आजुबाजूच्याही पाहिल्या. ज्या मैत्तिणी बिनलग्नाच्या आणि सिंगल होत्या त्यांचाही विचार केला.
तेही नाही म्हणून मग लग्नाची सूत्रं स्वत:च्या हातात घेत मॅट्रिमोनिअल साईटवर नावं नोंदवली..
पण किती पैसे भरणार? त्यापेक्षा आम्ही तीन मित्रांनी मिळून चार ठिकाणी नावं नोंदवली. युजरनेम आणि पासवर्ड शेअर केले आणि मग सुरु केलं नेटाने स्थळ संशोधन..
मजा यायची.. नंतर आम्ही स्वत:साठी कमी, दुसऱ्यासाठी मुलगी शोधायला लागलो, आपल्याला काय हवं हे माहिती असण्यापेक्षा मित्राला कशी मुलगी पाहिजे हे आमच्या डोक्यात पक्कं होतं..
दररोज रात्री आणि सुट्टीची दुपार हाच कार्यक्रम..!
दरम्यान मुली पाहणं सुरुच..
कधी आमचा नकार, तर कधी मुलींचा..!
पण आपण नाही फ्रस्ट्रेट झालो, फत्त* आमच्या मातोश्रींचं बी.पी. हाय व्हायचं, त्यांना कधी एकदा सुनमुख पाहू असं झालेलं..
वैताग.. वैताग.. या पोरी पाहणं म्हणजे..!
माफ करा भगिनींनो अधिक मैत्तिणींनो..
पण मुलींना कळतं कमी आणि त्या बोलतात फार, त्यांना पटतं फार थोडं पण त्या कनफ्यूज मात्र फार असतात.. फार फिल्मी विचार करतात...
माझ्या एका मित्राला एका मुलीनं विचारलं, ' तुमचं लाईफटाईम ड्रीम काय आहे ?'
तो बिचारा सहज म्हणाला, 'नाही, असा विचार केला कधी..!'
तर त्याला नकार..
का तर त्या मुलीच्या मते, तो अम्बिशियस नाही.. बाळू आहे..!
असं काहीही..
मी आणि माझे मित्र आता मुलींचे नकार आणि त्यांची कन्फ्यूज कारणं याविषयावर पुस्तक लिहू शकतो..
पण एक फुकट सल्ला..
मुली पहायला गेलात की कधीही खरं बोलायचं नाही, टिपीकल फिल्मी आदर्शवादी बोला, तुमचं लग्न लवकर जुळेल. पण जर खरं बोललात..तर नकार ऐकायला तयार रहा..!
हे वाचायला कितीही त्रासदायक असलं तरी मुलांना मुली पाहताना जेवढा मनस्ताप होतो, त्याचा कोणी विचारच करत नाही, या विषयाला काही ग्लॅमरच नाही..
पाचआकडी पगार कमावणाऱ्यांची ही गत तर मग महिन्याला पाच-दहा हजार रुपये कमावणाऱ्यांना पोरीचें बाप दारात उभं करत नसणार !
पुन्हा एकदा बायको म्हणून स्वीकारलं की आपल्या घरात ती कशी नांदेल अणि आपल्या आईशी तिचं कितपत जमेल हा जीवाला घोर असतोच..!
मग कशी करणार कुणी पसंत चटकन ?
मग काय आहेच दर रविवारी 'पाहणे' प्रश्न आणि पोपट..!


Best Regards,

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers