मी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केलेली आहे, परंतु ती जुन्या 'पेपर होल्डिंग' स्वरूपात आहे. मला आता ती डीमॅट स्वरूपात करायची आहे. त्यामुळे मला ऑनलाइनद्वारे फंडाच्या योजना विकणे, सौदे करणे आणि खरेदी करणे शक्य होईल. यासाठी मी काय करावे?
म्युच्युअल फंडातील पेपर होल्डिंग्जमधील गुंतवणूक डीमॅटमध्ये रूपांतरीत करणं सोपं आहे. प्रथम त्यासाठी तुमचं डीमॅट खातं हवं. तुमच्याकडे असलेल्या म्युच्युअल फंड योजनांचे डीमॅटमध्ये रूपांतर करण्यासाठी 'डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म'वर स्वाक्षरी करावी. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे सर्व म्युच्युअल फंडांच्या 'स्टेटमेन्ट्स ऑफ अकाऊन्ट्स'वर स्वाक्षऱ्या कराव्यात. असं केल्यानं तुमच्याकडे या योजना होत्या याचा कागदोपत्री पुरावा राहतो. जर तुमच्याकडे तीन वेगवेगळ्या म्युच्युअल मॅनेजमेन्ट कंपन्यांच्या योजना असतील तर तुम्ही तिन्ही कंपन्यांकडून स्टेटमेन्ट्स जमा करावीत. त्यानंतर डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म पूर्णपणे भरून त्यांच्यासोबत ही स्टेटमेन्ट्स जोडून डीपॉझिटरी पाटिर्सिपन्ट (डीपी)कडे सादर करावा. तुम्हाला डीपीकडून पोचपावती मिळेल. त्यानंतर डीपी स्थलांतराची प्रक्रिया सुरू करील. त्यासाठी डीपी, तुमचा अर्ज स्टेटमेन्ट्ससह संबंधित अॅसेट मॅनेजमेन्ट कंपनीकडे किंवा रजिस्ट्रारकडे आणि ट्रान्सफर एजंटकडे पाठविल. छाननीनंतर अॅसेट मॅनेजमेन्ट कंपनी किंवा ट्रान्सफर एजंट डीपीने पाठविलेल्या विनंती अर्जास अनुमती देईल आणि म्युच्युअल फंड योजना डीमॅटमध्ये स्थलांतरीत करील.
मला गोल्ड ईटीएफएसमध्ये गुंतवणूक करायची आहे. चांगल्या ईटीएफ योजनांची माहिती द्या आणि मी या योजना कधी खरेदी कराव्यात यासंबंधी मार्गदर्शन करा.
सध्या सोन्याचा भाव पाहता तुम्हाला सोन्यामध्ये किंवा ईटीएफएमध्ये गुंतवणूक करताना वाटत असलेली शंका रास्त आहे. परंतु, सोन्याचा धातू स्वरूपात भाव झपाट्याने वाढत आहे. ईटीएफचा नव्हे. सध्या दहा प्रकारचे गोल्ड ईटीएफ योजना बाजारात आहेत. त्यातून निवड करताना विशेष पर्याय नाहीत. परंतु, एनएव्हीशी तुलना करताना अॅक्सिस गोल्ड ईटीएफचे एनएव्ही १०० आहे तर रिलायन्स गोल्ड ईटीएफचे एनएव्ही १८६८ रुपये आहे. म्हणजेच तुलनात्मक रीत्या अॅक्सिस गोल्ड ईटीएफ स्वस्त आहे. गोल्ड ईटीएफ योजना कधी सुरू करण्यात आली त्यावर तिचं एनएव्ही मूल्य अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही निवड करताना ही बाब लक्षात घ्यावी. गोल्ड ईटीएफच्या कार्यक्षमतेचा वा एनएव्हीचा परिणाम तुमच्या निवडीवर होऊ देऊ नका.
मी काही डेब्ट फंडची खरेदी केलेली आहे. मी जर या योजनेची एक वर्षाच्या आत किंवा नंतर विक्री केली तर मला किती कर द्यावा लागेल?
डेब्ट फंडासाठी काळ मर्यादा महत्त्वाची आहे. जर तुम्ही एक वर्षाच्या आत त्यांची विक्री केली तर तुमच्या उत्पन्नात विक्रीमुळे झालेला फायदा समाविष्ट केला जाईल आणि करआकारणीच्या स्लॅब प्रमाणे तुमचं उत्पन्न कुठे बसते, त्यानुसार तुम्हाला कर द्यावा लागेल. परंतु, गुंतवणुकीनंतर एक वर्षानी विक्री केली असेल तर ती 'लाँग टर्म कॅपिटल गेन' समजला जाईल आणि ११.३३ टक्के (इंडेक्सेशनशिवाय) किंवा २२.६६ टक्के (इंडेक्सेशनसह) कर द्यावा लागेल. आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे डेब्ट फंडाच्या लाभांशावर करआकारणी होते. हा कर म्युच्युअल फंडांनी द्यायचा असतो (परंतु शेवटी तो गुंतवणूकदारांवरच लादला जातो). लाभांश कर १४.१६ टक्के आहे. एकंदरीत एक वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक केलेली असल्यास ती कराच्या दृष्टीने फायद्याची ठरते.
मी गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजना चांगले उत्पन्न देत नसल्याने त्या ऑगस्टमध्ये विकून टाकल्या. आता मला चांगल्या योजनांत पैसे गुंतवायचे आहेत. विकलेल्या योजनांचे पैसे माझ्या खात्यावर जमा होण्यापूवीर्च सेन्सेक्स झपाट्याने वाढत आहे. सध्या माझ्याकडे पाच लाख रुपये आहेत. ते मला लाँग टर्मसाठी गंुतवायचे आहेत. तर ते मला कोठे गंुतविता येतील?
तुमच्या पुढे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मला सहानुभूती वाटते. सध्या निर्माण झालेली गुंतवणुकीची संधी तुमच्या हातून गेल्याबद्दल चिंता करू नका. त्याऐवजी गुंतवणूक करताना आवश्यक असलेला संयम निर्माण करण्याची तुम्ही सवय करा. संपूर्ण पाच लाख रुपये, काही संधी हातातून निसटून जात आहेत, असं जरी तुम्हाला वाटत असलं, तरी एक रकमी त्वरित गुंतवू नका. बाजार घसरला तर तुमचा गुंतवणुकीविषयीच्या विश्वासाला तडा जाईल. मल्टी कॅप फंड्स आणि लार्ज कॅप फंड यांचा विचार करा. त्यामध्ये एचडीएफसी इक्विटी, डीएसपी ब्लॅकरॉक टॉप १००, बिर्ला सन लाइफ फ्रन्टलाइन इक्विटी प्लान ए किंवा एचडीएफसी टॉप २०० या सारख्या योजनांचा समावेश होतो. यापैकी कोणत्याही एका योजनेत किंवा अनेक योजनांत नियमित गुंतवणूक करता येईल.
0 comments:
Post a Comment