"आई एकविरा माता"
आई एकविरा मातेची कहाणी स्कंद्पुराण, महाभारत, गणेश पुराण, काली पुराण यांमधुन सांगितली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात, म्हणुनच आईचे चरित्र आभ्यासकंसाठी गुढ मानले जाते. भाविकांसाठी मात्र ती संकटात तारुन नेणारी , नवसाला पावणारी आणि सदैव कृपेची सावली होऊन पाठराखण करणारी जगतमाउली आहे. आई म्हणजे माया, दया, क्षमा शांती यांचे स्थान आहे.
आदिमाता श्री रेणुका हिच एकविरा माता होय. कान्यकुब्ज येथील राजा रेणु याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. पुढे त्याला कन्यारत्न झाले. तिचे नाव रेणुका असे ठेवले. ती वयात आल्यावर , पित्याने तिचे स्वंयवर मांडले. स्वंयवरात तिने जमदग्नी ऋषीना वरमाला घातली.या जोडप्याला पुढे पाच मुलगे झाले. रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वावसु आणि परशुराम. यातील परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याचा पराक्रम केला. अशा वीर पुत्राची माता ती एकविरा असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील थोर संत एकनाथ महाराज यांची एकविरा ही कुलदेवता होय. 'ते एकरुप एकविरा । प्रसवली बोध परशु धरा ॥' असे वर्णन त्यांनी केले आहे.
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment