आरती रेणुकेची
जय जय जगदंबे |श्री अंबे |रेणुके कल्पकदंबे || धृ.||
अनुपम स्वरुपाची |तुझि धाटी |अन्य नसे या सृष्टी
तुज सम रुप दुसरे|परमेष्ठी |करितां झाला कष्टी
शशिरस रसरसला |वदनपुटी |दिव्य सुलोचन दृष्टी
सुवर्ण रत्नांच्या |शिरि मुकूटी|लोपवि रविशशि कोटी
गज मुखि तुज स्तविले|हेरंबे मंगल सकला रंभे ||१||
कुंकुम शिरी शोभे|मळवटी|कस्तुरी टिळक लल्लाटी
नासिक अती सरळ|हनुवटी रुचिरामृत रस ओठी
समान जणुं लवल्या|धनुकोटी |आकर्ण लोचन भ्रुकुटी
शिरि निट भांगवळी|उफराटी कर्नाटकाची धाटी
भुजंग निळ रंगा |परि शोभे |वेणि पाठीवर लोंबे ||२||
कंकणे कनकाची |मनगटी | दिव्य मुद्दा दश बोटी
बाजुबंद नगे |बाहुवटी | चर्चुंनी केशर उटी
सुंगध पुष्पांचे |हार कंठी |बहु मोत्यांची दाटी
आंगी नवि चोळी|जरिकांठी |पीत पितांबर तगटी
पैंजण पद कमळी |अति शोभे |भ्रमर धांवती लोभे ||३||
साक्षप तू क्षितिच्या |तळवटी | तूंच स्वयें जगजेठी
ओवाळित आरती |दिपताटी |घेउनि कर संपुष्टी
करणामृत ह्रदये |संकटी धावे भक्तांसाठी
विष्णुदास सदा |बहु कष्टी |देशील जरि निज भेटी
तरि मग काय उणे |या लाभे | धाव पाव अविलंबे ||४||
जय जय जगदंबे |श्री अंबे|लक्ष्मी कल्पकदंबे
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment