sponsers

Monday, April 20, 2009

[GarjaMaharashtraMaza] मतदात्यांची व्यथा



मतदात्यांची व्यथा

आल्या निवडणुका जवळी नेत्यांचा एकच सूर
मतदातांना लुभविण्यासाठी आश्वासने भरपूर
जागोजागी मिरवणुका भाषणांचा पूर
हेलीकाँप्टर वाहणांचा पसरे धूळ धूर

प्रतिपक्षांना वाटे इतरांचा नेता मज़बूर
आपला नेता मात्र मजबूत आणि शूर
क्षेत्रिय राष्ट्रीय पक्षांच्या निरनिराळ्या युति
सरकार बनविण्याच्या लालचीने खेळली जाते राजनिती

चप्पल जोडे फेकण्याची सुरु झाली नवी प्रथा
झटपट स्वस्त प्रसिद्धीने मांडा आपली व्यथा
अभिनेता खेळाडूंनी रंगल्या प्रचार सभा
सामान्यांच्या समस्यां त्यात विसरुन गेल्या बघा

भ्रष्ट अपराधी झाले निवडणुकीचे उमेदवार
आयोगं न्याय संस्थां बंद करु शकले न द्वार
शिक्षित मध्यमवर्गीयांचा मत देण्यास निरुत्साह
इतर वोट बँकांचा निर्णयावर भारी प्रभाव

त्यासाठी मतदातांनी व्हावे सतर्क चतूर
सुराज्य सुशासनासाठी प्रयत्न करावे जरुर
सक्षम योग्य उमेदवारांनाच आता आणावे निवडून
लोकशाहीची लाज सांभाळावी आवर्जून

© दीपक ल. वाईकर २००९

श्री. दीपक ल. वाईकर ह्यांची रुची अभियांत्रिकी शिक्षण आणि ऊर्जा विषयावर व्याख्यान देण्यात, शोध निबंध लिहीन्यात आणि फावल्या वेळात काव्य व चर्चा करण्यात आहे.

दीपकच्या आणखी कविता वाचण्यासाठी भेट द्या

http://www.theinternetmarketinghelp.com/education

इंटरनेट मार्केटी बद्दल खास माहितीसाठी भेट द्या

http://www.theinternetmarketinghelp.com/

ही कविता आपल्या मित्रमैत्रिंनींना, नातेवाईकांना, सोबत काम करणा-यांना फेरबदल न करता, नांव न वगळता आपण पाठवू शकता. आपले अभिप्राय ह्या ई-मेलच्या पत्त्यावर dlwaikar@yahoo.com पाठवा.

__._,_.___
Recent Activity
Visit Your Group
Y! Messenger

Want a quick chat?

Chat over IM with

group members.

Yahoo! Groups

Stay healthy

and discover other

people who can help.

Yahoo! Groups

Cat Zone

Connect w/ others

who love cats.

.

__,_._,___

0 comments:

sponsers