क्षणात येता पाऊसधारा,
गडगडले मेघ अंतरी...
प्रेमवर्षा बरसवण्या,
आसुसले मन तुझ्यावरी...
खिळल्या नजरेत नजरा,
नि:शब्द ओठ जरी,
हिरमुसलेला अल्लड वारा,
प्रीत आपली सावरी,
प्रेमसागर खळाळणारा,
भावनांचे मनात मंथन....
स्पर्श तुझा भिजवणारा,
दे तुझ्या बाहूंचे बंधन....
थेंब ओघळणारा,
माझ्या गालावरी,
ओठाने तुझ्या टिपून घेता,
आला शहारा अंगावरी....
प्रेम घन ओथंबणारा,
बरसू दे माझ्यावरी....
हृदयात मज
विसावू दे निरंतरी....
- नूतन घाटगे
0 comments:
Post a Comment