पोलिसांच्या हातात कोलीत ?
सरकारने १५ वर्षांवरील वाहनांवर कर लावलेत, तर रस्त्यावरील नियम तोडणाऱ्या वाहन चालकांसाठी तिप्पट दंड आकारणार आहे. एका अर्थी हे बघायला गेल तर हे बरोबर आहे. कारण पैसेवाल्यांना सध्याच्या दंडाच काहीच वाटत नाही. कितीतरीजण सांगतात कि महिन्यातून कधीतरी एकदा सापडणार मग काय फरक पडतोय ? हा फरक अशा बेशिस्त वाहन चालकांना कळलाच पाहिजे. प्रदूषण करणाऱ्या काळा धूर सोडणाऱ्या जुन्या वाहनांना पाहिलं कि वाटत बर झाल सरकारने ह्या वाहनांवर कर लावला ते? या संदर्भात अजून एक चर्चा आहे कि आता पोलिसांची कमाई वाढणार. एका प्रमुख वृत्तपत्रात तर 'पोलिसांच्या हातात कोलीत' अशीच बातमी दिली. जर सर्वांना एवढ वाटत असेल कि पोलिसांची कमाई वाढणार तर सर्वांनी हे रोखायचा प्रयत्न केला पाहिजे आपण सावधानता बाळगायला हवी. (राजकारण्यानानी स्वताचे कितीही भत्ते वाढवुदेत, कितीही भ्रष्टाचार करूदेत ते चालेल. त्याकडे डोळेझाक करायची.) जर आपणच नियम तोडले नाहीत, सर्व कागदपत्र व्यवस्थित असतील तर कोणाला कशाला द्यायला हव. हल्ली कोणी कोणाला कारणाशिवाय फुकटात चहा सुद्धा पाजत नाहीत आणि पोलीस म्हटलं तर लोकांना ते आपले शत्रूच वाटतात. मग का द्यायचं उगाच पोलिसांना काही. पण तरीही लोक पोलिसांना स्वताहून देतात का ? त्यांची कमाई वाढवतात का ? कारण त्यांनीच काहीतरी गुन्हा केलेला असतो. शहरातील किती टक्के वाहन चालक नियमांचे पालन करतात? सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, रांगेची शिस्त न पाळणे, दारू पिऊन वाहन चालवणे, शर्यती लावणे या गोष्टी छोट्या मोठ्या शहरात सर्रास चालतात. का ? कारण प्रत्येकाला घरी जायची घाई असते. मागे बसलेल्या नाहीतर शेजारच्या व्यक्तीवर स्वताची छाप पाडायची असते त्यातूनच मग नियम मोडले जातात. बहुतेक जणांकडे गाड्यांची कागदपत्रे नसतात. मग अशा वेळी दंडाची पुरेशी रक्कम नसल्याने पोलिसांना पटवण्याचा प्रयत्न केला जातो. जर आपण पोलिसांना दोषी धरतो. तर मग आपली सुद्धा तेवढीच चुकी नाही का ? याचा विचार केला पाहिजे. सगळे जर कागदपत्रांमध्ये परिपूर्ण राहिले, शिस्तीत वाहने चालवली तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही. पोलिसांची (आपल्या भाषेतील) कमाई सुद्धा कमी होईल. आणि आपण सगळे पोलिसांची कमाई कमी झाली म्हणून आनंदाने झोपू तरी शकू ? वृत्तपत्रांच्या संरक्षणासाठी सरकार कायदा करणार आहे. त्यालाही वृत्तपत्रांच्या हातात कोलीत असाच म्हणायचं का ? कारण वृत्तपत्रे आता कायद्याच्या संरक्षणात एखाद्या राष्ट्रपुरुष, लोकप्रिय नेता, यावर टीका करू शकतात, एकाद्याच्या धार्मिक भावना दुखावू शकतात. मग हा कायदा लागू झाल्यावर काय म्हणायचं ?
वृत्तपत्रांच्या हातात कोलीत का ?
Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.
Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.
Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.
Post a Comment
0 comments:
Post a Comment