आला पाउस कोवळा
आला पाउस कोवळा मन मोरपिस झाले कश्या बरसल्या सरी सारे गाव पाणावले
आता येइल साजण मन होइल मोगरा माती सुवास उधळी कसे गाणे आतुरले
आली शहाऱ्याची लाट कशी मोहोरली वाट पाऊस खुळा झाला मन माझे खुळावले
मनी "संतोष" दाटला नभी दाटला पाउस बरसल्या "अमॄता"च्या तन-मन सुखावले
Post a Comment
0 comments:
Post a Comment