sponsers

Sunday, August 8, 2010

[GarjaMaharashtraMaza] राज यांच्यावर ‘अमर’प्रेम, राज ठाकरे सहृदयी माणूस

 

माणूस

राज यांच्यावर 'अमर'प्रेम, राज ठाकरे सहृदयी माणूस

Posted By Bokya Satbande On 09 Aug 2010. Under General  Tags: राज ठाकरे  Edit Post

राज यांच्यावर 'अमर'प्रेम, राज ठाकरे सहृदयी माणूस
(09-08-2010 : 11:23:34)

 

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : कॉम्प्युटर, इंग्रजी आणि ट्रॅक्टरला मुलायमसिग यादव यांनी विरोध केल्यामुळे उत्तर भारतीय तरुण मुंबईत येऊन मार खात आहेत, अशी खरमरीत टीका मुलायमसिग यांच्यावर करीत उत्तर भारतीयांचे नेते अमरसिग यांनी राज ठाकरे हे सहृदयी माणूस असल्याची स्तुतिसुमने उधळली.समाजवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अमरसिग यांनी लोकमंचची स्थापना केली असून आज लोकमंचच्या मुंबई प्रदेश कार्यालयाचे उदघाटन त्यांनी गोरेगाव येथे केले. त्या वेळी खा. जयाप्रदाही उपस्थित होत्या. राज ठाकरे यांनी मलेरियावरून केलेले विधान हे राजकीय आहे. मी त्याविषयी काही बोलणार नाही. राज ठाकरे यांच्याविरोधात बोलल्याने गरीब उत्तर भारतीयांना मार खावा लागतो. मागे २० हजारांहून अधिक उत्तर भारतीयांना मुंबई, पुणे सोडावे लागले होते. मला पोलिसांचे संरक्षण आहे. गरिबांना कशाला मार खायला लावायचा. राज ठाकरे आणि माझी भेट झाली होती. तो सहृदयी माणूस आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली मनसेच्या विरोधातील तलवार म्यान केली.
मुलायमसिग यांच्या धोरणांमुळेच उत्तर प्रदेश पिछाडीवर आहे. त्यांनी संगणक, इंग्रजी आणि ट्रक्टरला विरोध केला नसता तर उत्तर प्रदेशातील तरुणांना मुंबईत रोजगारासाठी यावे लागले नसते. त्यांचा पक्ष म्हणजे यादव फॅमिली पार्टी झाली आहे, अशी टीका त्यांनी केली

 

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.


Hobbies & Activities Zone: Find others who share your passions! Explore new interests.


Get great advice about dogs and cats. Visit the Dog & Cat Answers Center.

.

__,_._,___

0 comments:

sponsers