sponsers

Thursday, March 25, 2010

[GarjaMaharashtraMaza] Marathi... हॅल्लो..... !!

 

हॅल्लो..... !! 

मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...
मम्मी - हां हॅल्लो...
मुलगी - हॅल्लो
, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या
?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं
?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही
?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो
, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग
, 'करेन करेन' म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय
?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं
, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय
? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा...
मम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना
?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत
?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो
? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा
, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग
, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू
? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा
, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना...... अ‍ॅसिडीटी झालीय.
मम्मी - अ‍ॅसिडीटी
?
मुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू
?
मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम
?
मुलगी - अगं
, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय
?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग
, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस
?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली
?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो
?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू
? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला... डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच
?
मुलगी - अग
, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो...
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं
? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू...
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू
?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही
? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग
, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस
?
मुलगी - असं काय करतेस
? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर
, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल.... काहीतरीच काय
? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं
, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा
? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा
, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला
, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ? आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला
?
मम्मी - गधडे
, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला
? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा
? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी.... अय्या
, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें... मधुराच्या मम्मी...   

 
Best Regards,

Mahesh Bhoir
www.agrizatka.tk
www.maheshbhoir.tk
www.maheshbhoir.co.cc
+91 9870560065

__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___

0 comments:

sponsers