From: Marathi kavita <marathikavita56@
Date: 2009/4/7
Subject: Marathi kavita
To: marathikavita56@
Marathi kavita |
| Posted: 06 Apr 2009 01:30 PM PDT मला जिंकायचाय ghghgh अभिमानाला विसरून हात मिठीसाठी पसरून आज मला जिंकायचाय .. माझा हरवलेला मित्र अचानक लावलेला फ़ोन कान आतुरलेले दोन आज मला जिंकायचाय ताईचा आनंदलेला क्षण मांडीवरती डोकं सुस्तावलेले डोळे आज मला जिंकायचाय तो मातृत्वाचा उत्सव आजवर आयुष्यात हरलेल्या प्रत्येक गोष्टीचं आज मला मागणं आहे आयुष्यात लिहीलेलं बाकी सारं जगणं आहे कधीच हार पत्करून कोप-यात बसून रडू नकोस वसंतात फ़ुलून ये उन्हाळ्यात झडू नकोस आज मी रडणार नाही आज मी झडणार नाही आज मला जिंकायचाय Possibly Related Posts: मनोगत.. बहुरूपी अगम्य ** Romance with [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:26 PM PDT मनोगत.. ghghgh उभा मी शांत नदीकिनारी एकांतात वाट पाही कुणाची रोजचाच हा खेळ कैक येती इथे कुणी आनंदे, कुणी दुःखाने बेजार नकळतही येती काही परिस्थितीचे बळी जनं शोधतात सारे समाधान जे न मिळाले कधी जीवनात आठवणी उडती तयांच्या वार्यासंगत इथे स्वैर, विमुक्त आले न आज कोणी अजुनी संधीप्रकाश गडद थांब मना हो शांत दिवस नाही हा आगळा, खास बघ; येतेय ऐकू साद "श्रीराम जय राम जय जय राम" "श्रीराम जय राम जय जय राम…" Possibly Related [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:26 PM PDT बहुरूपी ghghgh ============ |
| Posted: 06 Apr 2009 01:24 PM PDT अगम्य ghghgh . अगम्य ———- रक्तरंजित, सामुदायिक, अपघाती, भीषण… अनेक रूपांनी येतोस भेटीला ….. प्रत्येकाशी निराळा वागतोस. लोक म्हणतात, " का ….. का असं ? " जसा हसत येतोस कुणासाठी, तसाच घालाही घालतोस कुणावर…. कुणाला इन्तज़ार करत तडपवतोस, कुणाला अवेळी उचलून नेतोस —- मातेदेखत पुत्राला, पत्नीसमोरून पतिला ….. कधी ज्याला नेतोस, त्यालाच रडवतोस; कधी पाठी उरणार्यांना असह्य वेदनांत झुरत ठेवतोस. स्वत:च्या मुक्तीची वाट पहाणारे अनेक असतात ….. स्वार्थासाठी नातेवाईकांना तुझ्या हवाली करणारेही कमी नसतात ….. " का साथ [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:23 PM PDT ** Romance with Death ** ghghgh तू जेव्हा कुणाला मिठीत घेतोस तडफडते कोसळते ओघळते मी.. पाहवत नाही साहवत नाही.. मनाला आवरते मी.. जाणवते तुझी धग तुझी रग तुझा रंग तुझा संग ती आग ती राख.. समजावते बहलवते स्वत:ला.. तुझी कॄपा माझ्यावरही होईल.. अलगद अलवार हल्केच मलाही मिठीत घेशील.. धूसर होतील नाती पुसट होतील स्मॄती करकचशील आवळशील.. अन एकाच झटक्यात जगाशी माझे बंध तुटतील.. मग ना कसले भय ना यातना ना कसले सल.. एकरुप होतील माझी सुखं - दु:खं तुझ्या मिठीत.. Possibly Related Posts: मला जिंकायचाय मनोगत.. बहुरूपी अगम्य काळ म्हणतात ना तुला.. |
| Posted: 06 Apr 2009 01:23 PM PDT काळ म्हणतात ना तुला.. ghghgh जगायला शिकलो… हसायला शिकलो… भलेभले डाव पाहिले फसायला शिकलो… शिकलो फक्त मीच जगलो फक्त मीच फसतानाही तेव्हा… हसलो फक्त मीच रोजचं जगणं आहे.. रोजचं हसणं आहे.. तुझ्या डावामागोमाग रोजचं शिकणं आहे… हो रे जुगारी, जुगारीच मी होतो, आहे, आणि राहणार…. तुझ्यावरही मी नेमका त्याचवेळी डाव खेळणार…. काळ म्हणतात ना तुला.. मीही बोलतोच आहे…. दोन शब्दांपुरतं मी तुला उगा मनी तोलतोच आहे…. तु म्हणजे सत्य, तु, तुच ना रे अंत… प्रारंभ तो बावळा फक्त तुच का [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:21 PM PDT आता काहीच क्षणांनंतर तो काळोखी क्षण जवळ येईल आणी मी त्या निरंतर काळोखाचा एक अवीरत भाग बनुन जाईल त्या काळोखापलीकडे काय असत कुणास ठाऊक ? पण मनुष्यस्वभाव तोडका पडतो इथे .. ते बघणाचे कुतुहल उरत नाही कितीही जगलात तरी अजुन जगत राहण्याची लालसा कमीच होत नाही ghghgh न जाणे किती वेळ चालु राहील हा जीवघेणा प्रवास ? आणखीन फक्त काहीच क्षण.. हळुहळु त्या काळोखी [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:21 PM PDT मी खपल्याची उठवता आवई खपलो तरी वर येईन फ़ुगुन वर तरंगत राहीन असल्या भुक्कड विषाचा माझ्या आतड्यांवर काहीच इफ़ेक्ट नाही व्हायचा ghghgh तसं दोस्ता आपलं भेटणं नाही झालं तरी तुझ्या स्वप्नात येईनच माझा दारुळ थोबडा बघून तुझी दारुण अवस्था होईल उठून तडक 'तिकडेच" जाशील नाही उठलास तर अंथरुण भिजवशील तसं आपलं बोलणं ताठ ! आपल्या केसांना वळण नाही आणि बोलण्याला आडवळण नाही. समोर आल्यावर, दोस्ता, आपलं वागणं तसंच असेल जसं मागे असतं… 'दाखवण्या"साठी [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:19 PM PDT जिवलगा !!! ghghgh कधीतरी येशीलच तू खुपसशील स्वतःची नखं सुरीसारखी ? की सुईसारखी ? वेदनांची लाही लाही करशील जीव त्राही त्राही करशील की माझ्या नकळतच घडून येईल सारं झुरका घेता घेता हातातून सिगारेट गळून पडावी तसा येशील ? ढील देता देता पतंग कटावा आपल्याही नकळत तसा येशील ? सिनेमा पहाता पहाता अचानक वीज जावी तसा येशील ? की लोकलगाडीतल्या गर्दीत श्वास घुसमटत असावा आणि स्टेशन येऊच नये… येऊच नये…येऊच नये… मनात नको नको ते विचार येऊन अंथरुणावर [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:18 PM PDT की मनापासून आनंद होईल बघताच तुला ? सुटल्यासारखं वाटेल तुरुंगातून मला ? ghghgh असेन निर्विकार कोमात पडलेला ? की असेन बागडत समुद्रावर पहुडलेला? की असेन लाटांशी खेळत बेसावध ? की असेन कड्याच्या टोकावर विहंगम दृश्य न्याहाळत ? चुकुन पंख समजून हात पसरेन अन येईन तुला भेटायला. येशीलच कधीतरी तू येईनच कधीतरी मीही. ————————————- तो तर येणारच आहे… पण त्याच्या येण्याचा विचारही मनाला नको वाटतो….असे असताना त्याला असे सामोरे जायचे, ही कल्पना, आणि [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:17 PM PDT वादा. ghghgh . वादा. ——- काही जण घाबरतात तुला, जाणते मी ! मायेच्या सोनेरी राजवाड्यातून उचलून नेशील, काळोखाच्या भयावह गर्तेत फ़ेकशील ….. असं कुणी भिनवलंय मनात त्यांच्या ! पण मी ओळखते तुला ! अरे, पित्याच्याही वरचा सर्वपिता कुणी असावा लागतो —- तो आहेस तू ! कधी धाक घालून, कधी जरब दाखवून, वळणावर आणतोस पोरांना . चॉकलेटं जरी झाली तरी अति खाऊन जन्त नाही का होणार ? दात नाही का किडणार ? अति वाईटच. मायेच्या राजवाड्याचंही तसंच आहे, हे समजवायचं काम कुणीतरी हवंच [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:15 PM PDT नातं तुझं-माझं ! ———————- ghghgh युगा युगांचं नातं तुझं-माझं एका स्वप्नानन्तर दिवसाच्या संगतीने जीवन जगल्यावर दुसर्या स्वप्नात शिरावं ….. तसा नेतोस, आणतोस ! नेतोस, अन् थेट पाठशाळेत पोचती करतोस … वाड - वडिलांच्या देखरेखीत घडते चर्चा —– भोगल्या जीवनाची. कळते वाट —– बाकी शिल्लक धड्यांची. नव्या उमेदीने मग मी पुन्हा शिरते जीवनाच्या उबेत ….. जगत रहाते , शिकत रहाते , चुका करते, पडतही रहाते ……. अन् मग येतोस तू ——- अलगद उचलायला , पुष्पक घेऊन [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:13 PM PDT मृत्यु ….. ————- ghghgh किती हवा असतोस रे… केवढी वाट पाहिलेय तुझी….. अनेकदा, अनेकदा ! तरीही साद नाही घालू शकत आज. खूप खूप निस्तरायचंय अजून….. अन् ह्याला बहाणा नको समजू ….. ठाऊक आहे रे मला, तुझी प्रीत, तुझ्या पोटातली अपार माया ….. वेळ येईल तेव्हा —- आईच्या पदरासारखा लपेटून घेशील कुशीत ….. आणि संपूर्ण मिटीन मी — चिन्तामुक्तशी !!! Possibly Related Posts: मला जिंकायचाय मनोगत.. बहुरूपी अगम्य ** Romance with Death ** |
| Posted: 06 Apr 2009 01:12 PM PDT आणि 'ती, माझी झाली,, , ghghgh कधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल, सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल…, तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती, ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा 'ती' माझी नव्हती…, ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता, नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता…, अशातच जेव्हा मी पहिलंदा तिला पाहिले, विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले…, तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके [...] |
| Posted: 06 Apr 2009 01:11 PM PDT उद्या ये……नक्की आज चा दिवस ज़रा जगुदे माझी माणसं आहेत त्यांना डोळे भरून बघुदे ghghgh गेला वाटतं……. आज येशील का रे तू अरे बघ ना…केंव्हाचा तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे जगण्याला त्रासलो आहे Possibly Related Posts: मला जिंकायचाय मनोगत.. बहुरूपी अगम्य ** Romance with Death ** |
| Posted: 06 Apr 2009 01:09 PM PDT मृत्यू ,अंत , सुरुवात ghghgh अस्पष्ट पुसट्सं काही अंधार दिशेला दाही हा कोंडून जाईल श्वास अन् मोडकळलेला ध्यास पडेल निपचित अंग उतरतील चेहर्यावरचे रंग बांधीन मनाशी गाठ मी ओलांडेन हा घाट तेथेच उभा तो संत वाटतो कसा मज अंत ? त्या अंतालाही आता सुरुवात मानतो माझी या जन्मीच्या कर्मांची या इथेच टाकतो ओझी त्या अंताची परिभाषा उमजेल मनाला जेंव्हा लेहलवाज टाकून सारा चमकेल एकला तारा Possibly Related Posts: मला जिंकायचाय मनोगत.. बहुरूपी अगम्य ** Romance with Death ** |
| Posted: 06 Apr 2009 01:03 PM PDT अमर्याद ghghgh येशीलच कधीतरी तू कधी येशील ? आज, आता उद्या परवा की अजून पन्नास पावसाळे जातील ? असा एखादा ज्योतिषी जर तेवढंच सांगता तर …? मजाच गेली असती सगळी. आणि विश्वासही नसता बसला. इथे तू येणार यावरही लोक विश्वास नाही ठेवत. असे जगतो असे हुंदडतो जसा तू नाहीसच अवतीभवती पण तू असतोस गुरुत्वाकर्षणासारखा सदोदित वाट पहात देठ तुटायची कधीतरी येशीलच तू कधीतरी येईनच मीही. Possibly Related Posts: मला जिंकायचाय मनोगत.. बहुरूपी अगम्य ** Romance with Death ** |
| Posted: 06 Apr 2009 12:57 PM PDT हलके हलके ghghgh कधीतरी येशीलच तू मधाळ हसत किंवा विचकत दात किंवा रक्ताळलेले ओठ घेऊन येशील किंवा येशील प्रेयसीच्या ऊष्ण श्वासासारखा हळुवार मला घेऊन जायला तुझी एक फ़ुंकर पुरेशी आहे माझा हलका फ़ुलका प्राण उडेल म्हातारीच्या कापसासारखा अल्लद तरंगेल हंसाच्या पिसासारखा अल्लद मनसोक्त उडून घेईन मनसोक्त विहरून घेईन एक तेवढा क्षण पुरेल मला सार्या इच्छा पुर्ण करायला तेवढा एकच क्षण मला दे माझ्या मनासारखा बाकीचं सगळं आयुष्य घेऊन टाक त्या बदल्यात कधीतरी येशीलच तू तर असा ये कधीतरी येईनच मी तेव्हा [...] |
| Posted: 06 Apr 2009 12:52 PM PDT तु गेल्यावर मग जाणवल ghghgh तु गेल्यावर मग जाणवल मन माझ कस कस तरफडल आठवल मग ते तुझ असण हसर हसर अपल घरट उघड्यावर पडल तु गेल्यावर मग जाणवल मन माझ कस कस तरफडल माझीच तु या अहंकारातच जगलो स्वताच्याच धुंदीत नकळत पडलो क्षणभराच्या रागात काय काय बडबडलो घरट क्षणात मोडून बसलो कळलच नाही तेव्हा मन अस का वागल तु गेल्यावर मग जाणवल जग माझ सुन सुन राहिल तुझ्या शिवाय एकट [...] |
| Posted: 06 Apr 2009 12:46 PM PDT ओरखडे ghghgh अज्ञात भुतकाळाचे मनावर ओरखडे भविष्याच्या चाहूलीने हादरले वाडे………. सवाष्णीचा विटाळ वसनात अडकला ऐन सीमोल्लंघनात उंबरठा तडकला……… ओघळल्या साजात जीव गुंतला पैंजणातील घुंगरगोंडा पायात रूतला………. कासावीस गर्भारीन माजघरात अडली पुरल्या चिरगुटात माऊली रडली……… काळ धडकानी दार ढासळले गौरगणपती नदीकडे वळाले……… विझल्या चुलीत कोळश्यांची धुगधुगी मृतात्म्यांचे क्लेश आत्मा भोगी……… विजयकुमार……. Possibly Related Posts: नातं तुझं-माझं ! |
| Posted: 06 Apr 2009 12:46 PM PDT येशील जेव्हा स्वप्नात माझ्या ghghgh येशील जेव्हा स्वप्नात माझ्या दूर दूर जाऊ संपेल जेथे नभाचा किनारा दूर दूर जाऊ डोळ्यातले, हृदयातले.. श्वासातले, भासातले.. क्षण हे सारे हसरे तारे वेचून मोजून ठेवू.. संपेल जेथे नभाचा किनारा दूर दूर जाऊ फुलता फुले पवनामुळे उधळीत गंध चोहिकडे गंधात न्हाले गंधीत झाले मनधुंद बेधुंद होऊ संपेल जेथे नभाचा किनारा दूर दूर जाऊ ही रात चाली हळुवार चाली निश्चिंत मी हा असा पाहून तुजला तो चंद्र मजला निस्तेज वाटे कसा नयनाताले चांदणे त्यास थोडे देऊन [...] |
| Posted: 06 Apr 2009 11:21 AM PDT खरंच पितो तुला ghghgh बाटली रिकामी झाली होती समोर तुझी मस्ती चालली होती हिडीस हासत.. दाताड दाखवत.. मला डिवचत.. तुला वाटलं.. झाला ह्याचा अजगर आता समजलं का तू महासागर तू जरा 'महा'च आहेस.. कुचकट, खडूस आहेस पण मीही अगस्थीला जागा केलाय बघ तुला किती मागे रेटलाय.. घोटा घोटाने.. निळं..हिरवं.. खारट.. तुरट.. मचूळ.. गढूळ.. कोमट.. निवट.. घोट घोट प्यालो.. भरपूर प्यालो अरे.. अजून हसतोच आहेस? हे कसले चटके बसताहेत… सूर्य पण खाल्ला की काय मी..?? ओरडतंय कोण? ए उठ.. पाण्यातल्या जाळ्यात [...] |
| Posted: 06 Apr 2009 11:19 AM PDT मधुशाळा ( translation ) ghghgh हरिवंशराय बच्चन यांच्या 'मधुशाला' चा भावानुवाद अनुवाद- आनंदा मृदू भावांच्या द्राक्षफळांची आज घेऊनी आलो हाला प्रिये तुला माझ्या हातांनी आज पाजतो मधुप्याला नैवेद्य तुला पहिला दाखवतो तद् नंतर प्रसाद जगाला सर्वांआधी तुझेच स्वागत करते माझी मधुशाळा || १ || तहान तुला तर विश्वची बनते शीतल हाला एका पायावर साकी होऊन नाचत येईन घेऊन प्याला जगण्याची सारी धुंदी तर केंव्हाच केली तुझ्यावर अर्पण आज तुला अर्पण करतो मी दुनिया माझी, [...] |
| Posted: 23 Mar 2009 12:57 PM PDT माझा मीच उरत नाही… ghghgh उनाड वार्याच छेडन.. तुला दिसत नाही… काळ्याभोर बटात तुझ्या.. जीव गुनतल्याशिवाय राहत नाही… अल्हड वयाचा अल्हड चाळा कस तुला कलत नाही… सावर सावर.. तुलाही अन् मलाही… ही नशा… काही उतरत नाही…..! रूपातला गोडवा अन् त्यात हवेतला हा गारवा… ही शीरषीरी काही जात नाही… स्वप्न म्हणाव की सत्य… माझा मीच उरत नाही… Possibly Related Posts: |
| Posted: 23 Mar 2009 12:47 PM PDT विनवणी……… ghghgh विनवणी……… ह्रुदयात स्पंदनाना म्हणते जरा जपूनी हलकेच चाल टाका कुणी राहते तिथे अजूनी……|| १ || नयनांत आर्त माझ्या का आसवे भरू मी तो अजूनी त्यात आहे जाईल व्यर्थ भिजूनी……..|| २ || निद्रेस सांगते मी जाऊ नकोस तू सकाळी स्वप्नांत तोच आहे जाईल दूर निघूनी……..|| ३ || शब्दांस आज माझ्या आहे एक विनवणी भिनलाय माझ्यात तो एकेक शब्दातुनी…….. || ४ || कधी, कसे, कुठे कळेना सांडून गेलेच मी होताच स्पर्श त्याचा बहरली रातरानी……|| ५ || देवाकडे आज [...] |
| Posted: 23 Mar 2009 12:43 PM PDT ghghgh कळत नाही या वाटेवर……… कळत नाही या वाटेवर अस एकट किती वेळ चालायच? जे नव्हतेच आपले कधीही त्यांना का आपल मानायाच? ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा त्यांवर विसंबून तरी का रहायच? ग्रिश्माने होरपळलेल्या मनाने पुरालाच का चांगल मानायाच? आहेत शब्द आपणा पाशी पण इथे नाहीत कुणालाच कान तेव्हा मनातल्या भावनांना फ़क्त कागदावरच स्थान द्यायच? की आपलच कुठेतरी चुकतय अस मानून गप्प रहायच? नाही सापडत ना उत्तर म्हणुन प्रश्न्नानकड़ेच दुर्लक्ष करायच? की आपणही [...] |
| Posted: 23 Mar 2009 12:37 PM PDT जीवनाचे गुपित ghghgh जन्माला आला आहेस थोड जगुन बघ जीवनात दुख खुप आहेत थोड सोसून बघ चिमुटभर दुखाने कोसलूं जाऊ नकोस; अपयश येत ते निरखून बघ घरट बांधन सोप असत; थोडी मेहनत करुन बघ जगण कठिन मरण सोप असत; दोन्ही मधल्या वेदना सोसून बघ जीवन मरण हे एक कोड आहे; जमलच तर ते सोडवून बघ ! Possibly Related Posts: तुकाराम घडत नाही सवय झालिये कोणीतरी विझवतय [...] |
| Posted: 23 Mar 2009 12:34 PM PDT सोबती ghghgh आयुष्यात दुखहालाच खरा सोबती म्हटले पाहिजे, कारण हा पाठराखा म्हणुन आपल्या सोबत नेहमी असतो, या सथिदारामुलेच तर सुखाचे महत्त्व कलते, याचे अस्तित्व नेहमीच सर्वाना जाणवते, याची शेवटपर्यंत साथ लाभते, हाच तो साथीदार ज्याच्यामुले सुखाची वाट मोकळी होते ! Tanvi……. Possibly Related Posts: |
| Posted: 23 Mar 2009 12:32 PM PDT ghghgh मैत्री ध्यानी मनी नसताना…. आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते…. हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या … मेंदी सारखी…. आयुश्यभर आठवत रहाते…. मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं….. मैत्री म्हणजे… कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं ….. घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं…. हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं…… मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं….. प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली… सर्वात सुंदर गोश्ट !…… मित्राचा [...] |
| You are subscribed to email updates from Marathi kavita To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
| Inbox too full? | |
| If you prefer to unsubscribe via postal mail, write to: Marathi kavita, c/o Google, 20 W Kinzie, Chicago IL USA 60610 | |
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
0 comments:
Post a Comment