हाय पाण्या मंदी, न्हाय पाह्यला कधी..२
ओ नाखवा बोटीनं फिरवाल का..?..२ !!ध्रु!!
नको मुंबय, नको पूना,
आव नको नको तो गोवा,
किल्ला कुलाबा मना खंदेरी-हुन्देरी दावा..२
न्हावा-शेवा खारी, लेनी घारापुरी..२
शिव दर्शन घरवाल का..?
ओ नाखवा बोटीनं फिरवाल का..?..२..!!१!!
वर~सावा, खार~दांडा, अर्नाला किल्ला तो पाहू,
नायगाव, सातपाटी, डहाणुच्या खारीन जावू..२
लय दिसाची हाय, इच्छा मनाची बाय..२
माजी हौस पुरवाल का..?
ओ नाखवा बोटीनं फिरवाल का..?..२..!!२!!
मी सोनी तुमची सोनी, मना प्रेमान म्हणता हो राणी,
डोळ्यांन पाहुद्या समुन्दराचं ते पाणी..२
सांगा जाणार कवा मला न्हेनार कवा..२
आता तारीख ठरवाल का..?
ओ नाखवा बोटीनं फिरवाल का..?..२..!!३!!
हाय पाण्या मंदी, न्हाय पाह्यला कधी..२
किल्ला जंजिरा दाखवाल का..?
ओ नाखवा बोटीनं फिरवाल का..?..४
गायक :- रेशमा सोनावणे.
गीत:-एकनाथ माळी. पनवेल-रायगड.
Best Regards,
Mahesh Bhoir
www.agrizatka.
www.maheshbhoir.
www.maheshbhoir.
+91 9870560065
__._,_.___
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment