विरह
तू निघून चालली आहेस कायमची हे कळल्यावर
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुसत्या आसपास असण्यादिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
पण मधल्या काळात या शहराने
कुठलं तरी traffic जॅम , कुठलं तरी प्रदूषण ,
कुठला तरी कल्लोळ सोडला होता आपल्या दोघांमधे
आता
तुला शेवटचं पाहताना बघ कशी slow motion झाली आहे गर्दी
तुझ्या हसण्याच्या उंच पुलावरून दिसतायत मला खाली
तरंगत चाललेली हजारो माणसं
डोक्यावर चंपाचमेलीमोगरागुलाब उगवलेली
सार्या मोटारी उडू लागल्यात फुलपाखरं होऊन
स्कुटरी गुणगुणू लागल्यात भुंग्यांसारख्या
सायकली चा्लत आहेत आपोआप
कुणीतरी अदृश्य माणूस नुक्ताच सायकल शिकल्यासारख्या
रस्त्याच्या फांद्यांना रिक्शा लटकल्यात मधमाशांच्या पोळ्यांसारख्या
रेल्वेगाड्या यार्डातल्या वारुळांतून
कात टाकून बाहेर पडल्यात लखलख
आपण धावत सुटलो आहोत एका वेगळ्याच प्रवासाला
हे ठाऊक असल्यागत बसेस थांबून राहिल्यात Signals वर
आपलीच वाट पाहात
आपण कफल्लक झालो आहोत पुरते हे कळल्यासारखे
वाटेवरचे सारे भिकारी
उधळत सुटलेत ओंजळींनी हवेत त्यांचे सारे सुटे पैसे
आणि नाण्यांच्या त्या अलगद पावसातून
आपण निघालो आहोत एकमेकांना बिलगून
बेफिकिरीच्या एकाच छत्रीखालून
आपल्याला खात्रीच आहे
जणू कंडक्टर आपल्याला सोडेल फुकट कुठवरही
आणि आता निर्वाणीच्या या क्षणी
तू भिजून उभी आहेस माझ्यात चिंब
आणि माझ्या डोळ्यात तुझंच प्रतिबिंब
एकमेकांचा हात सोडून
आपण आयुष्याच्या या सर्वात उंच कड्यावर उभे आहोत
झोकून द्यायला संपवायला सगळंच तुझ्यामाझ्यातलं
पण
एक तुझ्या लक्षात येतंय का.... ?
झोकून देण्याआधीच
आपण ' पुन्हा ' तरंगायला लागलो आहोत
__._,_.___
Change settings via the Web (Yahoo! ID required)
Change settings via email: Switch delivery to Daily Digest | Switch format to Traditional
Visit Your Group | Yahoo! Groups Terms of Use | Unsubscribe
.
__,_._,___
0 comments:
Post a Comment