सायकल आणि नेपोलियन
बाबा लहान असतानाची त्यांची सायकल पप्पूने दुरुस्तीसाठी नेली. सायकलची अवस्था पाहून सायकलदुकानदार म्हणाला, "ही सायकल दुरुस्त होणं अवघड आहे.' त्यावर पप्पू म्हणाला, "होईल की; कालच आम्हाला नेपोलियन बोनापार्टचा धडा शिकवला. त्यात तर तो म्हणत होता की जगात काहीही अशक्य नसतं.' "मग त्याच्याकडेच घेऊन जा' सायकलदुकानदार शांतपणे म्हणाला.
प्रामाणिकपणा
नोकर - साहेब केराच्या टोपलीत मला पाचशेच्या या पाच नोटा सापडल्या.
साहेब - मीच फेकून दिल्या त्या. नकली आहेत.
नोकर - हो, मला माहितीय म्हणून तर मी त्या तुम्हाला देतोय.
दारूडा
एक दारूडा रस्त्यावरून जात असतो. समोरून त्याला एक जण येताना दिसतो तेव्हा,
दारूडा - अरे माझ्यासाठी एक टॅक्सी घेऊन ये.
व्यक्ती - ए कोण तू? मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा - मग कोण आहेस?
व्यक्ती - एअर कमांडर.
दारूडा - मग विमान घेऊन ये!
उशिराचे कारण
शिक्षक - काय रे बंड्या शाळेत यायला उशीर का?
बंड्या - बाऽऽई तेऽऽ
शिक्षक - ते ऽऽ ते काय?
बंड्या - मागच्या चौकात लिहिलं होतं, की "पुढे शाळा आहे हळू जा' म्हणून!
आजोबा तुम्हीच लपा
आजोबा - बंड्या लवकर लपून बस. आठवडाभर शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे मास्तर आलेत.
बंड्या - तुम्हीच लपून बसा. न येण्याचं कारण "आजोबा वारलेत,' असं मी सांगितलंय.
लाडू
आई - अरे काल मी किचन ओट्यावर दोन लाडू झाकून ठेवले होते. कुठं गेले ते?
पप्पू - रागवतेस कशाला आई. रात्रीच्या अंधारात काल मला दुसरा लाडू सापडला नाही.
आनंद
बायको - मी मरणार आहे.
नवरा - मी पण मरीन मग.
बायको - का?
नवरा - एवढा आनंद मी सहन करू नाही शकत!
एन्जॉय
नवरा - आज रविवार. मला सुटी एन्जॉय करायचीय. त्यासाठी मी तीन तिकिटं आणली आहेत.
बायको - तीन का?
नवरा - तू आणि तुझ्या आई बाबांसाठी.
दोरी
एकदा एक ट्रक दुसऱ्या ट्रकला दोरीने ओढून नेत असतो. ते पाहून एक वेडा हसायला लागतो.
का रे का हसतोयस? दुसरा वेडा त्याला विचारतो.
अरे बघ ना एकच दोरी न्यायला दोन दोन ट्रक आणलेत.
झाकण हरवलं
एक दारूडा रस्त्यात पडलेला असतो.
पोलीस - एवढी दारू का प्यायलास?
दारूडा - काय करणार साहेब, पर्यायच नव्हता.
पोलीस - का काय झालं?
दारूडा - बाटलीचं झाकणच हरवलं होतं.
चुकीची कॉपी
परीक्षा हॉलमध्ये,
शिक्षक - काय झालं बाबू टेन्शनमध्ये आहेस?
पट्टी नाही आणलीस? पेन विसरलं का? हॉल तिकीट हरवलं का?
बाबू - नाही हो, मी वेगळ्याच विषयाची चीट आणलीय.
शिकार
एकदा एक माणूस जंगलामध्ये अडकतो तर अचानक त्याच्यासमोर वाघ येतो.
तो लगेचच डोळे बंद करून रामरक्षा म्हणायला लागतो.
रामरक्षा संपते आणि तो डोळे उघडतो तेव्हा वाघ समोर असतो आणि तो वदनी कवल घेता म्हणत असतो.
झंप्याचा गाढवपणा
रस्त्याने गपगुमान चालत असलेल्या झंप्याला अचानक मागून गाढवाची
जोरदार लाथ बसली. झंप्या कळवळला.
पण , धीर न सोडता ' बदला 'घेण्यासाठी तो गाढवाच्या मागे पळू लागला.
गाढव पळत सुटलं. झंप्या धावत होता. अखेर त्याला वाटेत एक झेब्रा उभा असलेला दिसला.
झंप्या झटकन झेब्र्याच्या मागे गेला आणि झेब्र्याला जोरदार लाथ हाणत म्हणाला ,
काय रे.. गाढवा! नाइट ड्रेस घालून मला येडा बनवतोस काय रे ??
आश्चर्य
गंपू - (सुंदर लेडी डॉक्टरला) मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायला नक्कीच आवडेल...
डॉक्टर - मग ते आश्चर्यच असेल... मी प्रसूतिगृहात डॉक्टर आहे.
संताचं लॉजिक
एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला.
सगळे गावकरी म्हणाले , ' वा ,हे चांगलं झालं. '
संता - हो ना , पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची.
आता सावलीतून पोहत जाता येईल.
--
Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235 Make money from Stock Market.
http://sanikastock.hpage.com